मेस्‍सीने सलग सातव्यांदा पटकावला ‘बॅलन डी’ओर पुरस्कार

मेस्‍सीने सलग सातव्यांदा पटकावला ‘बॅलन डी’ओर पुरस्कार
Published on
Updated on

पुढारी : ऑनलाईन डेस्क

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याला फुटबॉल मैदानावरील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुन्हा एकदा 'बॅलन डी'ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मेस्सीने सलग सात वेळा हा हा पुरस्कार प्राप्त करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. यावेळी मेस्सीचा पुरस्कार सामना पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि बायर्न म्युनिकचा रॉबर्ट लेवांडोव्स्की यांच्याशी होता. मात्र मेस्सीने या दोन स्टार खेळाडूंना मागे टाकत 'बॅलन डी'ओर पुरस्कारावर माेहर उमटवली आहे.

लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015 आणि 2019 मध्ये हा विशेष पुरस्कार पटकावला होता. मेस्सीनंतर क्रिस्टियानो रोनाल्डोने सर्वाधिक वेळा हा पुरस्‍कार आपल्‍या नावावर केला आहे. त्‍याने  2008, 2013, 2014, 2016 आणि 2017 मध्ये हा विशेष पुरस्कार जिंकला. या दोन खेळाडूंनंतर, मार्को व्हॅन बास्टेन, जोहान क्रुफ आणि मायकेल प्लॅटिनी यांनी प्रत्येकी तीन वेळा हा विशेष पुरस्कार जिंकला.रोनाल्डो नाझारियो, फ्रेंच बेकनबॉअर, अल्फ्रेडो डी स्टेफानो, केविन कीगन, कार्ल हेन्झ यांनी अनुक्रमे प्रत्येकी दोनदा हा विशेष पुरस्कार जिंकला आहे.

हा पुरस्कार दरवर्षी क्लब किंवा राष्ट्रीय संघात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. हा विशेष पुरस्कार सर्वप्रथम 1956 मध्ये देण्यात आला होता.

हेही वाचलं का? 

पाहा व्हिडिओ : भारतातील पहिलं पॉड हॉटेल सुरू झालय मुंबई सेंट्रलला | Pod Hotel Mumbai | Mumbai Travel Vlog

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news