पुढारी ऑनलाईन डेस्क :
पाळी म्हटलं की आजही लोकांच्या भूवया उंचावतात. स्त्रीचे महिन्याच्या मासिक पाळीचे 'हे चार' दिवस आजही तिच्या पुरते मर्यादीत आहेत असे म्हंटल तर वावग ठरणार नाही. थोडक्यात हे दिवस तेरे भी चूप और मेरे भी चूपवाले आहेत. मागील काही वर्षांमध्ये परिस्थिती बदलत असली तरी याचे प्रमाण खूप कमी आहे. आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. हा मे महिन्याच्या २८ मे राेजीच का साजरा करतात हे जाणून घेवूया… (World Menstrual Hygiene Day)
आजही आपल्याकडची परिस्थिती पाहता मासिक पाळीवर बिनधास्तपणे आणि जाहीरपणे बोलणं टाळलं जातं. पाळी म्हटलं की कुजबूज ऐकायला मिळते. बहूतांश महिला आजही मासिक पाळीच्या संबधित माहीतीबद्दल अनभिज्ञ आहेत. मासिक पाळी आल्यानंतर घ्यावयाची काळजी, पाळी येण्या गोदर आणि नंतर आपल्या शरीरात होणारे बदल, मानसिकतेत होणारे बदल, आजार याबद्दल माहिती नाही किंवा अपूरी आहे. ही परिस्थिती फक्त ग्रामीण भागातच आहे का ? तर अजिबात नाही शहरातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. महिलांनी मासिक पाळीच्या दिवसात कशी स्वच्छता घ्यायची याबद्दल माहीती मिळावी, त्यांच्यात जागरूकता वाढावी यासाठी हा दिन मे महिन्याच्या २८ तारखेला साजरा केला जातो.
'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन' (World Menstrual Hygiene Day 2022) दरवर्षी मे महिन्याच्या २८ तारखेला साजरा करतात. सर्वप्रथम, २०१४ मध्ये मध्ये एका एनजीओने मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्यास सुरुवात केली. साधारणपणे, महिलांच्या मासिक पाळीचे चक्र हे २८ दिवसांचे असते. रक्तस्त्राव साधारणपणे ४ ते ५ दिवस होत असतो. म्हणूनच हा दिवस इंग्रजी वर्षातील पाचव्या महिन्यांची म्हणजे मे महिन्याच्या २८ तारखेलाच साजरा करतात.
हेही वाचलंत का?