memory : सतत एका जागी बसाल तर स्मृती होईल कमकुवत

memory
memory
Published on
Updated on

न्यूयॉर्क : शरीर म्हटले की त्याला व्यायाम हवाच. सतत एका जागी बसून राहणे आरोग्याला अपायकारक आहे. न्यूयॉर्कच्या ग्लोबल वेल बीईंग लीडने केलेल्या संशोधनाअंती यावर वैज्ञानिकद़ृष्ट्या शिक्कामोर्तब झाले आहे. कार्यालयीन कामात अनेक तास बसून राहणे ही तशी सामान्य बाब आहे. कार्यालयात काम असो की अन्य काम. दीर्घकाळ बसण्याचा परिणाम आपल्या मेंदूवर (memory) पडतो. यामुळे स्मृती कमकुवत होते. यामुळे अनेकदा गरजेच्या गोष्टी विसरतात.

प्रौढ व्यक्ती कामादरम्यान 8 तास एकाच जागी हालचाल न करता घालवतात. मात्र, नव्याने करण्यात आलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, अशा लोकांनी दिवसातून 3 तास उभे राहणे आवश्यक आहे. यामुळे दीर्घायुष्यासाठी (memory) मदत मिळते. उभे राहिल्यामुळे रक्तशर्करा पातळी कमी होते. एवढेच नव्हे तर हृदयरोगाची जोखीम कमी होते आणि 8 तास बसून राहणार्‍यांच्या तुलनेत त्यांची तणाव व थकव्याची जोखीम कमी होते.

ग्लोबल वेल बीईंग लीडचे मायलॉर्ड हॉवेल यांच्या मते सलग बसून राहिल्यामुळे काळानुरूप मानसिक (memory) आरोग्य आणि स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम घडतो. उभे राहिल्यास न्यूरल एजिंगच्या मुद्यांशी लढण्यात मदत मिळू शकते. उदा. मेडियल टेम्पोरल लोब बिघडणे, हा मेंदूचा असा भाग आहे, ज्यामध्ये स्मरणशक्ती असते. याशिवाय दीर्घकाळ बसल्यावर शरीराच्या सर्व भागांतील रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत न झाल्याने मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन व पोषक तत्त्वांची कमतरता भासते. दीर्घकाळ एके ठिकाणी बसल्यावर या पूर्ण प्रक्रियेवर परिणाम होतो. याचा परिणाम आपल्या पायांवरही होतो.

छोटासा ब्रेक आवश्यक

सतत एका जागी (memory) बसून काम करतानासुद्धा काही वेळासाठी तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे, असे डॉक्टरही सांगतात. अगदी तीन मिनिटांसाठी जरी तुम्ही जवळच एखादी चक्कर मारली तरी तुम्हाला शरीर ताजे झाल्यासारखे वाटेल. मग नव्या दमाने तुम्ही स्वतःचे काम आणखी मन लावून करू शकता. थोडक्यात सांगायचे तर एकसुरी काम करण्याऐवजी छोटासा ब्रेक घेणे सर्वच द़ृष्टिकोनांतून उत्तम.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news