महापौर किशोरी पेडणेकर : “कुटुंबाला काही झालं तर सहन करणार नाही”

महापौर किशोरी पेडणेकर : “कुटुंबाला काही झालं तर सहन करणार नाही”

मुंबई, पुढारी ऑनलाईन 

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कुटुंबाला धमकीचे पत्र आल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत भावनिक झाल्या. महापौर पेडणेकर म्हणाल्या की, "विजेंद्र म्हात्रे नावाने धमकीचे पत्र मिळाले. पत्रातील भाषेचा अश्लील आहे. मारून टाकून अवयवयांची विटंबना करू, असंही त्या पत्रात म्हंटलं आहे. काहींचा कटकारस्थान करण्याचा प्रयत्न आहे. जर माझ्या कुटुंबाला काही झालं तर मी सहन करणार नाही", असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

आशिष शेलार आणि पेडणेकर यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर धमकीचं पत्र मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगून अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले होते. गेल्यावर्षीही महापौरांना फोनद्वारे आली होती जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

महापौर किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, "हे पत्र अत्यंत अश्लिल भाषेत आहे, स्त्रीच्या प्रत्येक अंगाचा यात उल्लेख आहे. घरच्यांना, मुलांना मारुन टाकू, पत्रामध्ये आत वेगळं नाव  आणि पत्ता आहे. बाहेर पाकीटावर वेगळं नाव आणि पत्ता आहे. हे पत्र पनवेलहून पोस्ट करण्यात आलं आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, मी शिवसेनेची कार्यकर्ती असून धमकावून घरी बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे", असंही त्यांनी सांगितलं आहे.

महापौर पेडणेकरांना दुसऱ्यांदा मिळाली धमकी

काल संध्याकाळी महापौर बंगल्यावर आलेल्या पत्रात महापौर आणि  सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. हे पत्र पनवेलमधून कुरिअरद्वारे आलेलं आहे. पेडणेकर यांना दुसऱ्यांदा ही धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी फोन कॉलवरुन त्यांना धमकी देण्यात आली होती. महापौर पेडणेकर स्वत: पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत. पत्रात नाव वेगवेगळी असल्यानं हे पत्र कुणी पाठवलं आहे याचा तपास होण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news