राजू शेट्टी : ‘अलमट्टीची उंची वाढवल्यास चिपळूणला जास्त धाेका’ | पुढारी

राजू शेट्टी : 'अलमट्टीची उंची वाढवल्यास चिपळूणला जास्त धाेका'

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा

अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास त्याचा कोल्हापूर व सांगली पेक्षा चिपळूणला जास्त धोका अधिक आहे. कारण अलमट्टी धरणाची उंची वाढली तर कोयना धरणातील पाण्याची क्षमता संपेल आणि चिपळूणमध्ये पाणी सोडले जाईल. त्यामुळे शासनाने महाराष्ट्र-कर्नाटक जलवाटप कराराबाबत पुनर्विचार करणे गरजेचे आहे.

कमी वेळात अतिरिक्त पडणारा पाऊस आणि धरण आणि नद्यांची जलवहन क्षमता कमी होणे, त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होत आहे. यावर गाळ काढणे हाच उपाय आहे. त्यामुळे शासनाने पैशाचे कारण सांगू नये, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. चिपळूण बचाव समितीतर्फे सुरू झालेल्या उपोषणाला त्यांनी आज सकाळी भेट देऊन पाठींबा जाहीर केला. याबाबत ज्या वेळी आपली मदत लागेल त्या वेळी आपण आपल्याबरोबर राहू अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा

Back to top button