Mayawati | ‘बसपा’ कोणासोबत? NDA की INDIA, मायावतींनी जाहीर केली भूमिका

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती. ( संग्रहित छायाचित्र )
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती. ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी बसपा विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीमध्ये सामील होणार असल्याचा दावा फेटाळत बसपा लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. २०२४ च्या सर्व निवडणुका 'बसपा' स्वतंत्र लढेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. यासंदर्भातील माहिती मायावती (Mayawati) यांनी त्यांच्या अधिकृत 'X' (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून दिली आहे.

मायावती यांनी 'X' वरून (पूर्वीचे ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'एनडीए' आणि 'इंडिया आघाडीमधील बहुतांश पक्ष हे गरीब विरोधी, जातीयवादी, भांडवलदार समर्थक आणि भांडवलशाही धोरणे असलेले पक्ष आहेत, ज्यांच्या धोरणांविरुद्ध बसपा सतत संघर्ष करत आहे आणि त्यामुळेच त्यांच्याशी युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या पार्श्वभूमीवर आगामी २०२४ च्या लोकसभा आणि राज्यसभा अशा सर्व निवडणुका बसपा स्वतंत्र लढणार (Mayawati) आहे.

बसपा विरोधकांच्या जुगाड आणि हेराफेरीपेक्षा परस्पर बंधुभावाच्या आधारे कोट्यावधी उपेक्षित, विखुरलेल्या समाजाला जोडून घेत आगामी निवडणूक लढणार आहे. २००७ प्रमाणेच लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका एकट्यानेच लढवणार आहे. त्यामुळे माध्यमांनी पुन्हा पुन्हा गैरसमज करून फेक न्यूज पसरवू नयेत, असे आवाहनदेखील मायावती यांनी (Mayawati) स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news