Asia Cup 2023 : पाकिस्‍तानला मोठा दणका, आशिया चषक क्रिकेट स्‍पर्धा श्रीलंकेत होणार?

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आशिया चषक २०२३ क्रिकेट स्‍पर्धा श्रीलंकेमध्‍ये होण्‍याची शक्‍यता आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. मे महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात आशियाई क्रिकेट परिषद ( एसीसी ) याबाबत अंतिम निर्णय घैणार आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्ताननेही बीसीसीआयच्या आशिया चषक 2023  (Asia Cup 2023 ) पाकिस्तानमधून बाहेर हलवण्याच्या आवाहनाला पाठिंबा दिला होता. आता पाकिस्तानऐवजी या स्‍पर्धेचे यजमानपद श्रीलंका भूषविण्‍याची शक्‍यता असल्‍याचे या वृत्तात नमूद करण्‍यात आले आहे. आता ही स्‍पर्धा श्रीलंकेत झाल्‍यास पाकिस्‍तान यामध्‍ये सहभागी होणार का, हे पाहणे उत्‍सुकतेचे ठरणार आहे.

पाकिस्‍तानमध्‍ये सामने खेळणार नसल्‍याचे भारताने केले होते स्‍पष्‍ट

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्‍तानमध्‍ये जाणार नाही, असे स्‍पष्‍ट केले होते. त्‍यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) भारतात ऑक्‍टोबर २०२३ मध्‍ये होणार्‍या वन-डे विश्वचषक स्‍पर्धेवरबहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. आशिया चषक स्‍पर्धा पाकिस्‍तानमध्‍ये व्‍हावी यासाठी पाकिस्‍तान क्रिकेट बोर्डचे चेअरमन नजम सेठी यांनी दुबईमध्‍ये आले होते. या स्‍पर्धेतील भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यातील सामने भारत युनायटेड अरब अमिराती (युएई) मध्‍ये खेळेल, असा प्रस्‍ताव त्‍यांनी दिला होता. मात्र त्‍यांच्‍या या प्रस्‍तावाला कोणीही स्‍वीकारले नाही. कारण श्रीलंका नेहमीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर ( बीसीसीआय ) होता. बांगलादेश क्रिकेट मंडळानेही पाकिस्‍तानच्‍या प्रस्‍तावाला विरोध करत असल्‍याचे 'एसीसी'च्‍या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

Asia Cup 2023 : 'युएई'त सामने खेळविण्‍याचा पाकिस्‍तानचा प्रस्‍ताव फेटाळला

युनायटेड अरब अमिराती (युएई) मध्ये सप्टेंबरमध्ये उन्‍हाचा तडाखा असतो. आखाती प्रदेशातील उष्णता खेळाडूंना सहन होणार नाही, यामुळे बीसीसीआयसह अन्‍य क्रिकेट मंडळांनीही आखाती उन्हात खेळण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. दुबईने यापूर्वी 2018 आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते परंतु खेळाडूंसाठी ही एक अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा होती. त्‍यामुळे भारताने युएईमध्‍ये सामने खेळावे, या पाकिस्‍तानचा प्रस्‍तावाला कोणीही स्‍वीकारले नाही. त्‍यामुळे आता ही स्‍पर्धाच अन्‍य देशात खेळवली जाण्‍याची शक्‍यता आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्ताननेही बीसीसीआयच्या आशिया चषक 2023 ला पाकिस्तानमधून बाहेर हलवण्याच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. आता पाकिस्तानऐवजी या स्‍पर्धेचे यजमानपद श्रीलंका भूषविण्‍याची शक्‍यता असल्‍याचे पीटीआयने म्‍हटलं आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news