Brahmin Marriage : ब्राह्मण मुलांच्या लग्नातील समस्या : कोटीतील पॅकेज, परदेशी नवरा… नको गं बाई!

Brahmin Marriage : ब्राह्मण मुलांच्या लग्नातील समस्या : कोटीतील पॅकेज, परदेशी नवरा… नको गं बाई!

सांगली : मृणाल वष्ट : भारतातील नोकरी, करिअर सोडून केवळ बाहुलीसारखं राहण्यासाठी परदेशात नोकरी करणाऱ्या मुलासोबत लग्न का करावं, असा सवाल करीत ब्राह्मण समाजातील उच्चशिक्षित मुली परदेशी स्थळांना चक्क नकार देत आहेत. परिणामी, मुलांची लग्नं लांबणीवर पडत असल्याचे चित्र आहे. (Brahmin Marriage)

संबंधित बातम्या : 

ब्राह्मण समाजातील सर्व संबंधितांशी संवादानंतर जाणवलेली निरीक्षणे अशी अनेक उच्चशिक्षित मुले परदेशात स्थायिक होत आहेत. त्यांना पॅकेजही कोटीत मिळते. कंपनीचा बंगला, सर्व सुविधा, ग्लॅमर आहे; पण तरीही ही स्थळे काही मुली नाकारतात. आम्ही लग्न कुणासोबत करायचे? मुलासोबत की त्याच्या परदेशी नोकरीसोबत? मग आमच्या नोकरीचे काय, आतापर्यंतच्या शिक्षणाचे काय, हे सर्व मुलासाठी सोडून द्यायचे..? असे आहेत मुलींचे सवालावर सवाल. त्याचे कोणतेही उत्तर मुलाकडील मंडळींकडे नाही. तुम्हाला एक पत्नी म्हणून मुलगी हवी आहे की हक्काची, फुकटात घरकाम करणारी मोलकरीण? या स्वाभिमानी मुलींच्या सवालांना उत्तर देण्याची हिंमत या मंडळींमध्ये नाही. परिणामी, मुलांची लग्नं मात्र लांबणीवर पडत आहेत. (Brahmin Marriage)

काही मुली परदेशातील स्थळे विचारपूर्वक नाकारत आहेत. कारण मुलीही उच्चशिक्षित. त्याही नोकरी करतात, परदेशातील मुलं घाईतच भारतात येतात. त्यांच्या तेथील स्थितीबाबत येथे ठोस माहिती असतेच असे नाही. ही मुले गडबडीने लग्नं ठरवतात. त्यामुळे खातरजमा करायला वेळच मिळत नाही. यातून फसवणूक झाल्याच्याही अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. (Brahmin Marriage)

मुली उच्चशिक्षित झाल्या आहेत. जोडीदार आपल्यापेक्षा शिकलेला आणि अधिक पगार मिळवणारा असावा, ही त्यांची अपेक्षा आहे. मुली आत्मनिर्भर बनल्या आहेत. त्यामुळे त्या भवितव्याचा विचार करत आहेत. यामध्ये मुले व पालक कोणताच मार्ग काढताना दिसत नाहीत. त्यामुळे वय पुढे जात आहे.

– केदार खाडिलकर, अध्यक्ष, ब्राह्मण सभा, सांगली

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news