President Putin Defence Officer : पुतिनच्या सर्वात जवळच्या महिला अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

President Putin Defence Officer : पुतिनच्या सर्वात जवळच्या महिला अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

Published on

सेंट पीटर्सबर्ग; पुढारी ऑनलाईन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आणखी एका जवळच्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ५८ वर्षीय मरिना यांकिना नावाच्या या संरक्षण महिला अधिकाऱ्याचा १६ व्या मजल्यावरील इमारतीच्या खिडकीतून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना सेंट पीटर्सबर्ग येथील आहे. मरिना यांकिना यांचे निधन हे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूंच्या मालिकेतील एक नवीन नाव आहे. याआधी सुद्धा पुतिन यांच्या जवळचे अनेक अधिकारी किंवा त्यांच्या नातेवाईकांचा गूढपणे मृत्यू झाला आहे. युक्रेन युद्धासाठी सर्वात सक्रिय निधी उभारणाऱ्यांपैकी यांकिना एक होत्या. (President Putin Defence Officer)

५० मीटर उंचीवरून पडून यांकिना यांचा मृत्यू (President Putin Defence Officer)

रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील जामशिना रस्त्यावर मरिना यांकिना हिचा मृतदेह पडलेला होता, तेव्हा तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने तिला पाहिले. ५० मीटर उंचीवरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनमधील युद्धाच्या वित्तपुरवठ्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

यांकिना या संरक्षण मंत्रालयातील आर्थिक विभागाच्या प्रमुख होत्या. पुतीन यांच्या युक्रेनमधील युद्धाला निधी देण्यात मरीना यांकिना या महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. रशियाच्या तपास यंत्रणेने त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. ही संस्था त्यांच्या मृत्यूची चौकशी करत आहे. (President Putin Defence Officer)

वेस्टर्न मिलिटरी रिजनमध्ये सामील होण्यापूर्वी मरिना यांकिना यांनी फेडरल टॅक्स सर्व्हिसमध्ये काम केले होते. त्या सेंट पीटर्सबर्ग येथील प्रॉपर्टी रिलेशन कमिटीच्या डेप्युटी चेअरमनही होत्या.

पुतिन यांच्यासाठी केला निधी गोळा

डेली मेलच्या वृत्तानुसार, या प्रकरणात आत्महत्येची शक्यता आहे. मात्र, चौकशी अहवाल येईपर्यंत काहीही सांगता येणार नाही. रिपोर्टनुसार, जेव्हा पुतिन यांनी एक वर्षापूर्वी युक्रेन युद्ध सुरू केले होते, तेव्हा मरिना यांनी पुतिन यांच्या या मिशनसाठी निधी गोळा केला होता. पुतिन यांचे युक्रेन मिशन अद्याप कोणत्याही यशस्वी टप्यापर्यंत पोहोचलेले नाही.

प्राथमिक तपासात मरीना या इमारतीच्या १६ व्या मजल्यावर राहत होत्या की येथे काम करायची याबाबत परस्परविरोधी वृत्त समोर येत आहे. या घरात त्याच्या वैयक्तिक गोष्टी सापडल्या असल्या तरी, येथून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी होती जवळीक

डेली मेलच्या वृत्तानुसार, मरीना यांकिना यांचे पुतिन प्रशासनातील अनेक अधिकार्‍यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. अहवालानुसार, मरिनाचे माजी चीफ ऑफ स्टाफ मिखाईल मोकेर्तोव्ह यांच्याशी जवळचे संबंध होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेपूर्वी मरिनाने तिच्या माजी पतीशी फोनवर बोलले होते. रशियन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, या महिलेला प्रकृती संदर्भात समस्या असल्याचे कळते.

एका रशियन मीडिया आउटलेटनुसार, मरिना यांचा अलिकाडच्या काळात खूप वेगाने प्रगती झाली होती. पाच वर्षांत त्या एका सामान्य कर्मचार्‍यापासून ते संपूर्ण विभागाच्या प्रमुख बनल्या होत्या.

यांकिना यांचा मृत्यू हा काही रशियातील पहिला हाय-प्रोफाइल मृत्यू नाही, २०२२ च्या सुरुवातीपासून डझनभर हाय प्रोफाईल रशियन व्यक्तींचा गुढरित्या मृत्यू झाले आहेत.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news