झेंडूच्या फुलांना कवडीचा भाव; व्यापाऱ्यांवर सणासुदीत तोट्याचा घाव

झेंडूच्या फुलांना कवडीचा भाव
झेंडूच्या फुलांना कवडीचा भाव

इचलकरंजी : पंकज चव्हाण हवामान आणि उष्णतेमुळे फुलांवर परिणाम झाला असला तरी, दसऱ्यानिमित्त बाजारामध्ये झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. यामुळे फुलांचे दर घसरले आहेत. बाजारात आज (मंगळवार) दुपारी एक किलो झेंडूची विक्री 5 ते 15 रुपये किलो दराने केली जात आहे. वस्त्र नगरीत दसऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची विक्री होते, परंतु यंदा पहिल्यांदाच पाच रुपये ते दहा रुपये किलो प्रमाणे फुलांची विक्री झाली.

दरम्यान, बाजारपेठेमध्ये दुपारनंतर ऑक्टोबर हिट जाणवू लागली. उन्हाचा भरपूर कडाका असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी झेंडूची फुले तशीच रस्त्यावर सोडून जाणे पसंत केले. आवक वाढल्यामुळे दर मोठ्या प्रमाणावर घसरला अन् व्यापारी तोट्यात आला. त्यामुळे वस्त्र नगरीतील झेंडू विक्रेत्यांचा दसरा तोट्यात गेला.

नवरात्र आणि दसऱ्यानिमित्त फुलांना जास्त मागणी असल्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी फुले विक्रीस पाठविली आहेत. झेंडू, शेवंती या फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. आवक वाढल्याने घाऊक बाजारात झेंडूचे दर कमी झाले आहेत.

बाजारातील विक्रेते म्हणाले, 'यंदा झेंडूचे उत्पादन जास्त झाल्याने मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. गणेशोत्सवात दर न मिळाल्याने दसऱ्याला दर मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी फुलांचे प्लॉट राखून ठेवले होते. मात्र, यंदा जास्तीचे उत्पादन आणि ऑक्टोबर हीट यामुळे बाजारात दाखल झेंडूच्या फुलांपैकी ५० टक्के फुलांचा दर्जा खराब आहे. मात्र, आवक जास्त असल्याने झेंडूला दर कमी मिळत आहे. गेल्या वर्षी बाजारात 70 ते 80 रुपये किलो प्रमाणे दर मिळाला तर, चांगल्या क्वालिटीच्या फुलांना शंभर ते दीडशे रुपये दर मिळाला होता. परंतु यंदा पाच रुपये किलो प्रमाणे विक्री करावी लागली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news