Vladimir Putin | व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका; बेडरूममध्ये फरशीवर कोसळले- रिपोर्ट

रशियाचे अध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन.
रशियाचे अध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आला असून, ते बेडरूमच्या फरशीवर कोसळलेले आढळले असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. क्रेमलिन या टेलिग्राम चॅनेलच्या माजी अधिकाऱ्याने त्याच्या टेलिग्राम चॅनलवर हा दावा केला आहे. मात्र, रशियन सरकार किंवा कोणत्याही मीडिया एजन्सीने याची पुष्टी केलेली नाही. (Putin Heart Attack)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रेमलिनच्या सुरक्षा रक्षकांना पुतिन हे त्यांच्या बेडरूममध्ये जमिनीवर पडलेले आढळले. यानंतर त्यांना विशेष वैद्यकीय सुविधेत नेण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रेमलिनच्या रक्षकांना पुतिन त्यांच्या बेडरूममध्ये जमिनीवर पडलेले आढळले. पुतीन यांची प्रकृती खालावल्याची माहिती डॉक्टरांना तातडीने देण्यात आली. त्यानंतर त्यांना विशेष वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. आता त्याच्या प्रकृतीबाबतही अपडेट समोर आले आहे. (Putin Heart Attack)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीसंबंधी अलीकडच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर तक्रारी सुरू आहेत. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान, पुतीन कधीकधी अशक्त तर कधी व्हिडीओमध्‍ये हात हलवताना दिसले आहेत. गेल्या वर्षी युक्रेनवर हल्ला सुरू झाल्यापासून, ७१ वर्षीय रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची तब्येत सतत खालावत असल्याच्या अनेक बातम्या मीडियामध्ये आल्या आहेत. (Putin Heart Attack)

रशियाचे माजी लेफ्टनंट जनरल यांनी ही माहिती दिली की, त्यांच्या टेलिग्राम चॅनल जनरल एसव्हीआरवर ही माहिती शेअर केली आहे. पुढे त्यांनी सांगितले की, पुतिन यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या खोलीतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. जेव्हा ते आत गेले तेव्हा त्यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष जमिनीवर पडलेले दिसले असे देखील त्यांनी केलेल्या दाव्यात म्हटले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news