Yuva Sangharsh Yatra : शरद पवारांचा एक काळ होता… काय म्हणाले रोहित पवार? घ्या जाणून | पुढारी

Yuva Sangharsh Yatra : शरद पवारांचा एक काळ होता... काय म्हणाले रोहित पवार? घ्या जाणून

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील टिळक स्मारक येथे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेची आशिर्वाद सभा होत आहे. यावेळी आशिर्वाद सभेला युवकांची तसेच पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे. स्टेजवर तसेच सभागृहाबाहेर देखील कार्यकर्त्यांनि मोठी गर्दी केली आहे. युवा संघर्ष यात्रेच्या आशीर्वाद सभेत रोहित पवार बोलत होते.

यावेळी बोलताना म्हणाले, अधिवेनशात कुणी कविता म्हणतात, तर कुणी गाणं म्हणतंय, कुणी काहीतरी वेगळीच कमेंट करतंय. शरद पवारांचा एक काळ होता त्यावेळी गांभीर्याने सगळ्या गोष्टीवर चर्चा होत होती, कविता ऐकून काय मिळणार आहे. असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले. .

ते पुढे म्हणाले, आम्ही भुमिका बदलावी आणि सत्तेत जावं असं सांगितलं जातं होतं. सत्ता येते, सत्ता जाते, मात्र विचार कायम राहतात. आज ग्रामीण भागात शेतकरी अडचणीत असताना त्यावर कोणाचं चर्चा करताना दिसत नाही, याला अन्याय म्हणतात. अन्यायाला एकच उत्तर आहे तो म्हणजे संघर्ष, तो आपल्याला करावा लागेल. असे रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा

Armaan Malik Engagement : २ वर्षानी मोठ्या आशनासोबत अरमाननं उरकला साखरपुडा

दै. ‘पुढारी’ टोमॅटो एफएम आयाजित शॉपिंग उत्सव

Back to top button