Marathwada University: मराठवाडा विद्यापीठात मराठा आरक्षणासाठी दिवाळी साजरी न करण्याची शपथ

Marathwada University: मराठवाडा विद्यापीठात मराठा आरक्षणासाठी दिवाळी साजरी न करण्याची शपथ
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवारी (दि.३१) सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे यंदा दिवाळी साजरी न करण्याची शपथ यावेळी शेकडो विद्यार्थी, कर्मचारी व प्राध्यापकांनी घेतली. Marathwada University

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून मंगळवारी सायंकाळी कँडल काढण्यात आला. मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक सरसावले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ कँडल मार्चचा समारोप करण्यात आला. Marathwada University

या मार्चमध्ये विद्यार्थी, संशोधक, कर्मचारी प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांसमोर अधिसभा सदस्य डॉ. हरिदास सोमवंशी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते डॉ. प्रकाश इंगळे, संशोधक कृती समितीचे अजय पवार, राधा मोरे व कर्मचारी संघटनेचे नेते कैलास पाथ्रीकर यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात अधिसभा सदस्य डॉ. विक्रम खिल्लारे, डॉ. राम चव्हाण, डॉ. राजेश करपे, डॉ. तुकाराम सराफ, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. धर्मराज वीर, डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ. पंजाब पडूळ, नारायण पवार, लक्ष्मण नवले, डॉ. देवत सावंत यांच्यासह संशोधक, कर्मचारी, प्राध्यापक सहभागी झाले. डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी उपस्थित सर्वांना दिवाळी साजरी न करण्याची शपथ दिली. कँडल मार्चमध्ये मराठा आरक्षण विद्यार्थी जन आंदोलन समिती, सारथी विद्यार्थी संशोधक कृती समिती, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना व प्राध्यापक संघटना यांच्या कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news