औसा (जि. लातूर) : पुढारी वृत्तसेवा : marathwada rain : सततच्या पावसाने औसा तालुक्यात हाहाकार माजवला आहे. तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. याचा फटका उजनी मोड जवळील पुलाला बसला असून पुलास तडे गेल्याचा संशय आणि बाजूच्या पुलावरून वाहणारे पाणी पाहता जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्गाने खबरदारी म्हणून सोलापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे.
marathwada rain : औसामधील पटेल चौकात वाहनाना थांबविण्यात आले. परिणामी सोलापूर, तुळजापूरसह या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनांची कोंडी झाली.१०० किमी दुरचा प्रवास करण्याची वेळ आली आहे. सदरची पर्याय म्हणून वाहतूक उमरगा मार्गे करण्यात आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
उजनीतून वाहणाऱ्या तेरणा नदीला मंगळवारच्या पहाटेपासून पुर आल्याने उजनी बाजारपेठेसह गावातील घरे पाण्यात होती.जवळपास २४ तासापेक्षा जास्त पाण्याचा प्रवाह पुलावरून असल्याने पुलास तडा गेल्याचा संशय प्रशासनाला आहे. यासह बाजूच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहात वाढ झाली आहे.
त्यामुळे खबरदारी म्हणून पर्याय मार्गाने वाहतूक वळण्यात आली. औश्यातील पटेल चौकात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून सपोनि बाळासाहेब डोंगरे, फौजदार घोरपडे, हे.काँ.गिरी, संजय बेरलीकर,यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी तैनात होते. उजनीत आ.अभिमन्यू पवार, तहसीलदार भरत सुर्यवंशी, गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी भेट देवून पाहणी केली.
हे ही वाचलं का?