Marathi Movie – ‘सर्जा’ चित्रपटातील ‘धड धड’ गाणं भेटीला

सर्जा चित्रपट
सर्जा चित्रपट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी रसिकांच्या भेटीला लवकरच एक नवी कोरी म्युझिकल लव्हस्टोरी येणार आहे. 'सर्जा' शीर्षक असलेल्या या चित्रपटातील 'जीव तुझा झाला माझा…' हे काही दिवसांपूर्वी संगीतप्रेमींच्या भेटीला आलेलं गाणं चांगलंच गाजत आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव होत असताना 'सर्जा'मधील 'धड धड…' हे डान्स नंबर रिलीज करण्यात आलं आहे. अबालवृद्धांनाही ताल धरायला लावणाऱ्या या गाण्यावरही रसिक बेहद्द खुश होणार आहेत. लगीनसराईसोबतच सर्व सणांना तसेच समारंभांना हे गाणं मोठ्या आवाजात वाजणार आहे.

राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या 'सर्जा'ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी केलीय. रमेश रंगराव लाड या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीतप्रधान 'सर्जा' चित्रपटाचं दिग्दर्शन धनंजय मनोहर खंडाळे यांनी केलं आहे. या चित्रपटातील 'धड धड…' हे दमदार गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

दिग्दर्शक धनंजय खंडाळे यांनीच हे गाणं लिहिलेलं हे गाणं संगीतकार हर्षित अभिराज यांनी स्वत: आदर्श शिंदेच्या साथीनं गायलं आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला क्षणार्धात ठेका धरायला लावण्याची क्षमता 'धड धड…'मध्ये असल्याचं गाणं पाहिल्यावर तसंच ऐकल्यावर वाटतं.

हर्षित अभिराज म्हणाले की, एका सुमधूर ट्यूनवर दिग्दर्शक धनंजय खंडाळे यांनी 'धड धड…' हे गाणं लिहिलं आहे. आदर्श शिंदेच्या आवाजानं या गाण्यात एक वेगळाच रंग भरला आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण जग या गाण्याच्या तालावर थिरकणार असल्याचंही हर्षित अभिराज म्हणाले. 'धड धड…' हे गाणं मराठी रसिकांची धड धड वाढवणारं ठरेल आणि संगीतप्रेमी या गाण्यावर भरभरून प्रेम करतील असे निर्माते अमित पाटील यांचे म्हणणे आहे.

अनिल नगरकर, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, ऐश्वर्या भालेराव, आकाश पेटकर, ज्योति शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडाळे, कुणाल गायकवाड आदी कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news