Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचे मुंबईत निधन

Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचे मुंबईत निधन

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर (वय – 94) यांचे दादर येथील शुश्रुषा रुग्णालयामध्ये आज (दि. ४ जून) निधन झाले. त्यांचे नातू पराग यांनी ही माहिती दिली. प्रकृती बिघडल्याने सुलोचना दीदी यांना सकाळी उपचारांसाठी दाखल करण्यात होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दीदी (Sulochana Latkar) यांचे पार्थिव त्यांच्या प्रभादेवी येथील निवासस्थानी सकाळी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

'पद्मश्री' तसेच 'महाराष्ट्र भूषण'ने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांनी हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली. त्यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी झाला. 1943मध्ये त्यांनी अभिनयाच्या विश्वात पदार्पण केले. मराठी आणि हिंदी सिनेमांत चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी काम केले. (Sulochana Latkar Padma Shri Award)

सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान | Sulochana Latkar

अभिनयाच्या क्षेत्रात सुलोचना यांना भालजी पेंढारकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या तालमीत सुलोचनादीदी तयार झाल्या. आपल्या सोज्वळ दिसण्याने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले. प्रेक्षकांच्या मनात सुलोचनादीदी म्हणजे सोज्वळ, शांत आई अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. सिनेमांमध्ये त्यांनी घरंदाज भूमिका साकारल्या होत्या.

मराठी चित्रपटातील भूमिका केल्‍या | Sulochana Latkar In Marathi Film

सुलोचनादीदींनी २५०हून अधिक मराठी तसेच हिंदी सिनेमांत आपल्या अभियानाची छाप पाडली. 'वहिनीच्या बांगड्या', 'मीठ भाकर', 'धाकटी जाऊ' यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट तुफान गाजले. 'सांगत्ये ऐका', 'मोलकरीण', 'मराठा तितुका मेळवावा', 'साधी माणसं', 'एकटी' हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर चित्रपट ठरले.

हिंदी चित्रपटसृष्टीतही उमटवला अभिनयाचा ठसा | Sulochana Latkar In Hindi Film

मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचनादीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांचा मोतीलाल यांच्या बरोबरचा 'मुक्ती' हा चित्रपटही गाजला. त्यानंतर त्यांनी सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर, नाजिर हुसैन, अशोक कुमार यांच्या सोबतही काम केले. नायिका म्हणून त्यांनी ३० ते ४० चित्रपट केले असतील. 'दिल देके देखो' या १९५९ मधील सिनेमात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news