Sonali Kulkarni : ‘मुली आळशी, बॉयफ्रेंडवर दबाव टाकत असतात’

Sonali Kulkarni
Sonali Kulkarni

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिंघम, दिल चाहता है फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती मुलींबद्दल बोलताना दिसतेय. सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni ) प्रत्येक मुद्द्यावर आपले स्पष्ट मत ठेवते. व्हिडिओमध्ये सोनाली म्हणते की, आजकाल मुली खूप आळशी झाल्या आहेत. त्या आर्थिक रूपाने केवळ आपल्या बॉयफ्रेंड वा होणाऱ्या पतीवर अवलंबून राहू इच्छितात. (Sonali Kulkarni)

सोनाली कुलकर्णीचा व्हिडिओ व्हायरल

सोनाली कुलकर्णीने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीच्या व्हिडिओ समोर आला आहे. या क्लिपवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोकांचं म्हणणं आहे की, सोनालीने योग्य सांगितलं आहे, यासाठी लोक तिचे कौतुक करत आहेत. सोनाली म्हणते, भारतात खूप साऱ्या मुली आळशी आहेत. त्यांना असा बॉयफ्रेंड वा पती हवा की, ज्याच्याकडे चांगली नोकरी असेल. ज्याच्याकडे घर असेल. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की, आपल्या घरातील स्त्रियांना कार्यक्षम बनवा. ज्या स्वत:साठी कमवू शकतील. ज्या म्हणू शकतील की, नवा फ्रिज घ्यायचा आहे ना, अर्धे पैसे तू दे, अर्धे पैसे मी देईन..

सोनाली कुलकर्णीने आपल्या पती‍विषयी सांगितले की, माझे पती वयाच्या २० व्य वर्षापासून नोकरी करत आहे. तर मुली २५-२७ वर्षांच्या झाल्यातरी हेच विचार करत राहतात की, त्यांना काय करायला हवं आहे.

ती पुढे म्हणाली की, मुलींनी केवळ स्वयंपाक करू नये तर त्यापुढील जबाबदारी देखील घ्यायला हवी.

(NCMIndia Council For Men Affairs ट्विटरवरून साभार)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news