Operation Valentine : मानुषी छिल्लरचा वरुण तेजसोबत तमिळ चित्रपटात डेब्यू

मानुषी छिल्लर
मानुषी छिल्लर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मानुषी छिल्लरचा वरुण तेजसोबत तमिळ चित्रपटात डेब्यू करणार आहे. (Operation Valentine ) ऑपरेशन व्हॅलेंटाईन असे चित्रपटाचे नाव असून हिंदी आणि तेलुगू भाषेतील ट्रेलर हैदराबादमध्ये लॉन्च करण्यात आला. मानुषी चिल्लरच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे आणि म्हणून हा चित्रपट तिच्यासाठी खास आहे. (Operation Valentine)

संबंधित बातम्या –

भारताने पाहिलेल्या भयंकर हवाई हल्ल्यांपैकी एकाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट दोन भाषांमध्ये येणार आहे. हा चित्रपट अनोखी गोष्ट दाखवणार तर आहे सोबतीला एक अनोखी प्रेमकहाणी आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच नंतर मानुषी म्हणते " ट्रेलर बघून खूप आनंद झाला प्रेक्षकांचं प्रेम आणि सगळ्यांचा पाठिंबा हे माझ्यासाठी खूप आनंद देणारं आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीम कडून मिळणारा पाठिंबा हा खूप काही देणून जाणारा आहे या चित्रपटासाठी मी स्वतः ह खूप उत्सुक आहे. तेलगू सिनेमातून प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी खूप आतुर आहे."

ऑपरेशन व्हॅलेंटाइन मधून तिची एक अभिनेत्री म्हणून असलेली तिची अष्टपैलुत्व दाखवत नाही तिच्या अभिनयाची अनोखी बाजू दाखवून देतात. ट्रेलर लाँचचा शेवट टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात पार पडला. मानुषी, कलाकार आणि क्रू आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची खास पोचपावती आहे. शक्ती प्रताप सिंग दिग्दर्शित आणि सोनी पिक्चर्स, संदीप मुड्डा यांच्या रेनेसान्स पिक्चर्स निर्मित, हा चित्रपट १ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news