Maratha Reservation : मला अडवलं तर फडणवीसांच्या घरासमोर बसू : मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation
Maratha Reservation

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिशन मुंबई, ध्येय आरक्षणाचे म्हणत मराठा आंदोलनाचे नेते २० जानेवारीला मुंबईकडे कूच करणार आहेत. ते जालन्यातून प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, किती दिवस लागले तरी रक्षण घेऊनचं परतणार. (Maratha Reservation) मुंबईतील सगळ्या मराठा बांधवांनी एकत्र यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. (Maratha Reservation)

संबंधित बातम्या –

मला अडवलं तर फडणवीसांच्या घरासमोर बसू. गुन्हे दाखल केले तरी घाबरू नका. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. आम्हाला आवश्यक असलेलं सामान घेऊन चाललोय, आरक्षण घेऊनच मुंबईतून येणार. २० तारखेला मुंबईला जाणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आमरण उपोषण मुंबईत होणार आणि आम्ही उपोषणावर ठाम असून २० डिसेंबररोजी मुंबईला निघणार आहे. ट्रॅक्टर, रिक्षा, आदी वाहने  वाहने सोबत घेऊन मुंबईला पायी निघणार आहे. आमरण उपोषण मुंबईत होणारच.अहवाल कुठल्याही येवू, परंतु ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून माघार घेणार नाही.  आमच्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई किंवा जप्त केले तर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई व नागपूर येथील घरासमोर जाऊन बसणार असल्याचा इशारा  जरांगे पाटील यांनी दिला.

मुंबई येथे आमरण उपोषण करण्याचे ध्येय आणि दिशा ठरली असून ध्येय एकच मुंबईला जाऊन मराठा समाजाला आरक्षण घेऊन येणार आहे.  उपोषणासाठी  अन्नधान्य, अंथरुण पांघरुन, कपडे लत्ते  व जीवनोपयोगी वस्तू आम्ही वाहनातून  सोबत नेणार आहे.   आम्ही काही दगड धोंडे, काठया लाट्या नेणार नाही. त्यामुळे शासनाने आंदोलनाला परवानगी दिली किंवा नाही दिली, तरी आमरण उपोषण होणार आहे. सरकारच्या दडपशाहीच्या धोरणापेक्षा आमचे शांतेतेचे आंदोलन, लोकशाहीने दिलेले शस्त्र बोथट होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शांततेत आणि संयमाने हे आंदोलन करणार  आहे. घराघरातील मराठा समाज मुंबईला येणार आहे. घरी कोणी बसणार नाही.  मुंबईतील सर्वच ग्राऊंड आम्हाला लागणार आहेत. कारण ३ कोटी लोक मुंबई गाठणार असून ग्राऊंड मिळाले नाही, तर समुद्रकिनारी किंवा जागा मिळेल तिथे उपोषण होणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, गुरूवारी रात्री अंतरवाली सराटी येथून ३० वाहनातून शिष्टमंडळ मुंबई येथील सर्व ग्राऊंड पाहण्यासाठी गेले आहे. आज दिवसभर पूर्ण ग्राऊंडची पाहणी करणार आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबई शहरातील मराठा समाजाने आपआपसातील मतभेद, गटतट विसरुन व आमंत्रणाची वाट न पाहता  मुलांच्या हितासाठी आंदोलनात सहभागी होऊन साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news