Manish Sisodia News: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी घेतली आजारी पत्नीची भेट

Delhi Liquor Policy Case
Delhi Liquor Policy Case

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी न्यायालयाच्या परवानगीनंतर शनिवारी (दि.११) आपल्या आजारी पत्नीची भेट घेतली. या भेटीसाठी तिहार तुरुंगातून ते त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात  तुरुंगात असलेले मनीष सिसोदिया यांना शनिवारी सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान सहा तास पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. (Manish Sisodia News)

यानुसार, मनीष सिसोदिया पोलिस कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात सकाळी १० वाजता जेलच्या गाडीतुनच मथुरा रोडवरील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. यापुर्वीही जूनमध्येही त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आजारी असलेल्या त्यांच्या पत्नी सीमा यांना भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती. (Manish Sisodia News)

न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना पत्नीला भेटण्याची परवानगी देताना त्यांनी माध्यमांशी बोलू नये किंवा कोणत्याही राजकीय कार्यात सहभागी होऊ नये, असे आदेश दिले आहेत. आपचे वरिष्ठ नेते असलेले मनीष सिसोदिया यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्रीपदासह अरविंद केजरीवालांच्या सरकारमध्ये उत्पादन शुल्क विभागासह विविध खात्यांची जबाबदारीही सांभाळली होती. त्यांना अटक झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री आणि विविध खात्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात  मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज नुकताच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. (Manish Sisodia News)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news