Manipur violence | मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा भडकला; ३ कुकी सुरक्षा रक्षकांची हत्या

Manipur Voilence
Manipur Voilence

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये ३ महिन्यांहून अधिक दिवस सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये कोणतीही हिंसक घटना घडली नव्हती, पण आज शुक्रवारी (दि.१८) १२ दिवसांच्या शांततेनंतर  पुन्हा हिंसाचार भडकला आहे. येथील उखरूल जिल्हयातील एका गावात नवीन हिंसाचाराची घटना घडली. दरम्यान हत्यारे असलेल्या जमावाने गाव संरक्षक रक्षक असलेल्या तिघांची गोळ्या झाडून हत्या केली. हे सुरक्षा रक्षक कुकी समाजातील आहेत. या घटनेनंतर मणिपूरमधील या भागात पुन्हा तणाव वाढला (Manipur Voilence) असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या उखरूल शहरापासून ४७ किमीवर वसलेल्या कुकी आदिवासींचे गाव असलेल्या थैवाई कुकीमध्ये आज पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी घडली आहे. या भागात नागा जातीच्या तांगखुल जमातीचे वर्चस्व (Manipur Voilence) आहे. मात्र सध्या मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून मैतई आणि कुकी या आदीवासी जमातींमध्ये हिंसाचार भडकला आहे.

Manipur violence | हिंसाचारात केवळ मैतई आणि कुकी समाज

मणिपूरमध्ये ३ मे पासून इंफाळ डोंगराळ प्रदेशातील बहुसंख्य मैतई आणि त्याच्या आसपासच्या पाच जिल्ह्यांवर प्रभाव असेल्ला आदिवासी कुकी जमातींमध्ये जातीय हिंसातार भडकला आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंसक तणावामुळे येथील जवळपास ५० हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. या भागात २४ टक्के नागा, ५३ टक्के मैतई तर एवघे १६ टक्के कुकी लोग आहे. दरम्यान या हिंसाचारात केवळ मैतई आणि कुकी समाजाचे लोक सहभागी आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news