Shirur Lok Sabha Constituency: ‘वंचित’कडून शिरुरमधील मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द

मंगलदास बांदल
मंगलदास बांदल

मुंबई: पुढारी वृत्तसेवा: वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. Shirur Lok Sabha Constituency

बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे. Shirur Lok Sabha Constituency

वंचित बहुजन आघाडीने मनसेचे नाराज नेते वसंत मोरे यांना पुणे मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा न करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात सरळ लढत होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी रात्री उशीरा आपली लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. यामध्ये पाच जणांना उमेदवारी दिली आहे. अविनाश भोसीकर (नांदेड), बाबासाहेब उगले (परभणी), अफसर खान (औरंगाबाद), वसंत मोरे (पुणे) व मंगलदास बांगल (शिरूर) यांचा यामध्ये समावेश आहे. वंचितने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 25 उमेदवार घोषित केले आहेत. नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता.

 हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news