नागपूर : वंचितसोबत जागा वाटपाची चर्चा सूरूच : मुकुल वासनिक | पुढारी

नागपूर : वंचितसोबत जागा वाटपाची चर्चा सूरूच : मुकुल वासनिक

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा अनेक दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी चर्चा झाली आहे. माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय होईल? हे सांगता येत नाही. मात्र आम्ही शेवटपर्यंत चर्चा करण्यास तयार आहोत असे काँग्रेसचे नेते, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी आज विदर्भातील प्रचार दौऱ्यावर आले असताना विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

गेले काही दिवस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वंचित आघाडीचे  अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतभिन्नता उघड होत असताना वासनिक यांना सांगलीचा तिढा सुटला का, असे विचारले असता शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात अजून दहा जागांवर समाधानकारक चर्चा झाली नाही तरी तुंम्ही आमचंच विचारता असा सवाल करीत आमची चर्चा सकारात्मक होत आहे. लवकरच शेवटचा निर्णय येईल असे वासनिक म्‍हणाले.

हेही वाचा :

Back to top button