मन धागा धागा जोडते नवा – मुलगी झाली हो फेम माऊ साकारणार ‘आनंदी’

Divya Pugaonkar
Divya Pugaonkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी मालिका मन धागा धागा जोडते नवा स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा, आई कुठे काय करते यासारख्या मालिकांमधून स्टार प्रवाहने वेगळा विषय हाताळत मनोरंजन विश्वात नवा प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला. मन धागा धागा जोडते नवा ही मालिका घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे.

सतीश राजवाडे म्हणाले, 'स्टार प्रवाहने आजपर्यंत नेहमीच ज्वलंत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना घेऊन वेगवेगळ्या मालिका बांधल्या आहेत आणि त्या रसिकांसमोर सादर केल्या आहेत. आता नवी मालिका घेऊन येतोय आणि तो विषय आहे घटस्फोट, एका मुलीचा घटस्फोट. घटस्फोट हा कोणत्याही गोष्टीचा शेवट नाही.

आयुष्याच्या प्रवासात या एका अपघातानंतर बराच प्रवास असतो जो सहज सुखकर असू शकतो हे दाखवणारी ही मालिका आहे. प्रत्येक घटस्फोटित मुलासाठी, मुलीसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मन धागा धागा जोडते नवा ही मालिका एक प्रेरणादायी मालिका असेल याची आम्हाला खात्री आहे.'

मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेत दिव्या आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

दिव्या म्हणाली, 'स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझ्या आयुष्यातली मी पहिली मालिका केली होती. पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करताना आनंद होतोय. मुलगी झाली हो मालिकेत न बोलता खूप काही व्यक्त करण्याचं आव्हान होतं. या मालिकेत मी बोलणार तर आहे पण मनात खूप साऱ्या भावना साचवून. त्यामुळे आनंदी ही व्यक्तिरेखा एक अभिनेत्री म्हणून जास्त आव्हानात्मक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अभिनेत्याला स्क्रीनवर पहात आलेय त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं हे स्वप्नवत आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे हे कळेलच. पण या मालिकेच्या रुपात नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आनंदी साकारण्यासाठी सध्या मी माझ्या भाषेवर आणि आवाजावर काम करतेय. माऊ या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम आनंदीलाही मिळेल याची खात्री आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news