Mamata Banerjee
Mamata Banerjee

Mamata Banerjee: महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतून हकालपट्टीचे ‘कारस्थान’, पण…; ममता बॅनर्जींचे स्पष्टीकरण

Published on

पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या लोकसकसभा सदस्य खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेत्यांकडून महुआ यांना वारंवार टार्गेट केले जात आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोईत्रांची लोकसभेतून हकालपट्टी हे सत्ताधाऱ्यांचे मोठे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. पण २०२४ च्या निवडणुकीपूर्वी महुआ मोईत्रा यांना याचा फायदा होईल, असेदेखील ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे. (Mamata Banerjee)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (दि.२३) माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांच्या पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांची हकालपट्टी करण्याचे नियोजन केले जात आहे. पण मोइत्रा यांची प्रस्तावित हकालपट्टी त्यांना २०२४ लोकसभा निवडणुकीत मदत करेल, असेही त्या म्हणाल्या. मोहुआ मोईत्रा यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपानंतर बॅनर्जी यांनी मोईत्रा यांच्यावर केलेली ही पहिली टिप्पणी आहे. (Mamata Banerjee)

Mamata Banerjee: काय आहे 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरण

 भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर त्या संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतात या आरोपांनंतर महुआ सध्या चर्चेत आहेत. या आरोपांनंतर त्या सध्या अनेक वादात सापडल्या आहेत. याप्रकरणी महुआ मोईत्रा यांच्याविरोधात संसदीय समितीसमीतीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणावर संसदीय नैतिक आचरण  समितीसमोर सुनावणी सुरू आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही. (Mamata Banerjee)

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news