Maldives Vs Lakshadweep : मालदीवच्या द्वेषपूर्ण कमेंटवर ‘बॉलिवूड’ मधूनही नाराजीचा सूर

Maldives Vs Lakshadweep
Maldives Vs Lakshadweep
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. त्‍यांनी आपल्‍या लक्षद्वीप भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. यासोबतच त्‍यांनी  येथे भेट देण्याचे पर्यटकांना आवाहनही केले. यानंतर व्हायरल झालेले फोटो आणि संदेशावरून भारतात मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना सुरू झाली. हे सर्व मालदीवच्या काही नेतेमंडळींना आणि मंत्र्यांना खुपले आणि त्यांनी मालदीव आणि भारताच्या पर्यटनाची तुलना केली. त्यानंतर सोशल मीडियावर देखील ही तुलना सुरू झाली. या मुद्द्यावरून दोन्ही देशांचे सोशल मीडिया युजर्स देखील आपसात भिडले आहेत. तसेच बॉलीवूडमधील मंडळींनी मालदीवच्या द्वेषपूर्ण कमेंट्सवर नाराजीचा सूर ऐकवला आहे. (Maldives Vs Lakshadweep)

आजकाल मालदीव हे भारतीयांसाठी आवडते व्हॅकेशन स्पॉट बनले आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटी मालदीवला भेट देतात. बहुतांश बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींसाठी मालदीवला व्हॅकेशन स्पॉट आहे. मात्र आता भारत आणि मालदीवमध्ये वाद सुरू झाला आहे. दरम्यान या वादावर बॉलिवूडमधून देखील नाराजीचा सूर उमटत आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Maldives Vs Lakshadweep)

आपल्या स्वत:च्या पर्यटनाला पाठिंबा देऊया : अभिनेता अक्षय कुमारचे आवाहन

बॉलीवूड स्टार अक्षय कुमारने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मालदीवमधील प्रमुख सार्वजनिक व्यक्तींनी भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते ज्या देशात सर्वाधिक पर्यटक येतात त्या देशात हे करत आहेत. मी अनेकवेळा मालदीवला भेट दिली आहे. नेहमीच त्‍यांचे कौतुक केले आहे; परंतु सन्मान प्रथम येतो. चला भारतीय बेटांचा शोध घेण्याचे ठरवूया आणि आपल्या स्वत: च्या पर्यटनाला पाठिंबा देऊया, असे आवाहन देखील अक्षय कुमार यांनी पर्यटकांना केले आहे.
(Maldives Vs Lakshadweep)

'हे आपल्या भारतात आहे' – अभिनेता सलमान खान

या वादावर प्रतिक्रिया देताना सलमान खानने म्हटले आहे की, "आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना लक्षद्वीपच्या सुंदर, स्वच्छ आणि विस्मयकारक समुद्रकिनाऱ्यावर पाहून खूप आनंद झाला आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे आपल्या भारतात आहे".

जॉन अब्राहमचीही प्रतिक्रिया

'अभिनेता जॉन अब्राहम यानेही सुंदर भारतीय समुद्रकिनाऱ्यांची छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले आहे की, "आश्चर्यकारक! भारतीय आदरातिथ्यासह, "अतिथी देवो भव" ची कल्पना आणि विशाल सागरी जीवन एक्सप्लोर करते, असे म्हणत जॉन याने लक्षद्वीप हे पाहण्यासारखे ठिकाण आहे." असे देखील स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news