Malaria | मलेरिया अलर्ट! डासांच्या उत्पत्तीबरोबर ते करताहेत स्थलांतर, जाणून घ्या कारण

Malaria | मलेरिया अलर्ट! डासांच्या उत्पत्तीबरोबर ते करताहेत स्थलांतर, जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : हवामान बदलामुळे पृथ्वी सतत उबदार होत असल्याने, डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान हे डास जमिनीपासून हळूहळू उच्च उंचीवर वातावरणात पसरून इतर प्रदेशात स्थलांतरित देखील होत आहेत. तसेच भौगोलिक क्षेत्रात या डासांचे स्थलांतर देखील दिवसेंदिवस वाढत आहे. हे नवीन उत्पत्ती झालेले डास इतर प्रदेशांत पसरत असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका (Malaria) देखील वाढत आहे. अशाच प्रकराची घटना दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय उच्च प्रदेशांपासून पूर्व आफ्रिकेच्या लोकसंख्येच्या प्रदेशांपर्यंत दिसून आली आहे, यासंदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील ओटावा विद्यापीठातील मलेरियाचा अभ्यास करणार्‍या प्राध्यापक आणि संशोधक मनीषा कुलकर्णी यांच्यासह शास्त्रज्ञांनी डासांची वाढती संख्या आणि त्याच्या प्रसारासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. डासांच्या वाढत्या उत्पत्ती आणि प्रसारामुळे ज्याठिकाणी डासांचा प्रादुर्भाव (Malaria) नव्हता, त्या ठिकाणच्या लोकांना देखील मलेरियासारख्या रोगांचा सामना करावा लागू शकतो.

कुलकर्णी यांनी 2016 मध्ये एका अभ्यासाचे नेतृत्व केले, ज्यामध्ये असे आढळून आले की, मलेरिया वाहक डासांचा अधिवास एका दशकात उच्च पातळीवर पोहचला आहे. माउंट किलीमांजारो प्रदेशात शेकडो चौरस किलोमीटरने या मलेरियाच्या डासांचा प्रसार वाढला आहे. अमेरिकेतील हवाई या राज्यात देखील अशाच घटनेची नोंद झाली आहे. या राज्यात खालच्या स्थरात एव्हीयन मलेरियाचा प्रादुर्भाव वाढल्याने, स्थानिक अधिवास असणाऱ्या पक्षांवर देखील याचा परिणाम झाला आहे. हे पक्षांनी याठिकाणाहून पळ काढला आहे. अशाप्रकारचा अभ्यास आणि संशोधन हा बहुतेक आफ्रिकेवर केंद्रीत असून, २०२१ मध्ये मलेरियामुळे 96% मृत्यू झाले आहेत.

Malaria : आफ्रिकेत सर्वाधिक 80 टक्के मृत्यू पाच वर्षाखालील मुलांचे

2021 आणि 2022 दरम्यान मलेरियामुळे होणाऱ्या जागतिक मृत्यूंमध्ये 29 टक्के घट झाली असून, ही संख्या जास्त आहे. विशेषत: आफ्रिकेत मलेरियामुळे झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक 80 टक्के मृत्यू पाच वर्षाखालील मुलांचा झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2021 मध्ये मलेरियाची 247 दशलक्ष प्रकरणे नोंदवली आहेत. यामधील निम्मी प्रकरणे नायजेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि मोझांबिक याठिकाणी नोंदवली आहेत.

हवामान बदलाबरोबर मानवी हस्तक्षेपामुळे देखील डासांच्या संख्येत आणि विस्तारात बदल

जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डास विशेषतज्ज्ञ डग नॉरिस यांनी हवामान बदल आणि डासांच्या वितरणातील विस्तार किंवा बदल यांच्यातील दुव्याची पुष्टी केली. तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आणि बेडनेट आणि कीटकनाशकांचा वापर यांसारख्या मानवी हस्तक्षेपामुळे डासांच्या संख्येत होणारा बदल आणि त्याचा लोकांवर कसा परिणाम होईल हे सांगण्यात येणारी अडचण देखील त्यांनी अधोरेखित केली आहे.

मलेरियाचा प्रसार कसा होईल हे सांगणे आव्हानात्मक; जेरेमी हेरेन (अभ्यासक-नैरोबी)

नैरोबी स्थित इंटरनॅशनल सेंटर ऑफ इन्सेक्ट फिजियोलॉजी अँड इकोलॉजी येथे मलेरियाचा अभ्यास करणारे जेरेमी हेरेन यांनी नॉरिस यांच्या मतांना दुजोरा दिला आहे. त्यांनी नमूद केले आहे की, जिथे डासांचा प्रसार वाढला आहे, तिथे हवामान बदलाचा आधीच परिणाम झाल्याचे दिसते. पण मलेरियाचा प्रसार कसा होईल हे सांगणे आव्हानात्मक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news