Happy Birthday Mahesh Kothare : इन्स्पेक्टर महेश जाधवच्या ‘डॅमिट’ची अशी आहे इंटरेस्टिंग कहाणी

Happy Birthday Mahesh Kothare
Happy Birthday Mahesh Kothare
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवणारे महेश कोठारे यांच्या अभिनयाची सर कुणालाही येणार नाही. आज त्यांचा २८ सप्टेंबर रोजी वाढदिवस. महेश कोठारे या नावाहून अधिक त्यांचे महेश जाधव (Happy Birthday Mahesh Kothare) हे पात्र अधिक गाजलेले होते. अनेकविध चित्रपटांमध्ये त्यांनी इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती आणि या पात्राचे नाव होते -इन्स्पेक्टर महेश जाधव. इन्स्पेक्टर महेश जाधव यांचा 'डॅमिट' या गाजलेल्या डायलॉगच्या मागील कहाणी तुम्हाला माहितीये का? आणि महेश जाधव हे पात्र आलं कुठून? जाणून घेऊया. (Happy Birthday Mahesh Kothare)

महेश कोठारे यांचं शिक्षण किती झालं?

महेश यांनी बीएससीदेखील केलं आहे. तसेच एलएलबी ही कायद्यातील पदवीदेखील मिळवलीय. काही वर्षे त्यांनी वकिलीदेखील केली. धुमधडाका चित्रपटाच्या शूटिंगवेळी महेश यांनी आपली वकिलीची प्रॅक्टिस सुरु ठेवली होती. धुमधडाकाच्या यशानंतर त्यांनी प्रॅक्टिस सोडली आणि पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात उतरले.

हिंदी चित्रपटात बालअभिनय

महेश कोठारे यांनी बालकलाकार म्हणून 'छोटा जवान' या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटातील हिरो ते दिग्दर्शक असा त्यांचा प्रवास वाखाणण्याजोगे आहे. धुमधडाका हा त्यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट होता. महेश कोठारेंसोबत अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे यांची धमाल या चित्रपटात दिसली होती. फुल थ्री धमाल हा एक त्यांचा हिट झालेला चित्रपट ठरला होता.

घरचा भेदी, लेक चालली सासरला अशा अनेक चित्रपटामध्ये त्यांनी व्हिलेनची भूमिका केली. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ या चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून कम पाहिले.

इन्स्पेक्टर महेश जाधव पात्रामागील कहाणी

महेश हे क्रिमिनल वकील होते. त्यामुळे त्यांचा पोलिसांशी फार जवळचा संबंध आला. त्यांना पोलिसांविषयी आकर्षण होतं. म्हणून ते स्वत: इन्स्पेटक्टर महेश जाधव झाले, असे महेश यांनी एखा मुलाखतीत सांगितलं होतं. ज्या ज्या चित्रपटांमध्ये इन्स्पेक्टर महेश जाधव हे पात्र साकारलं, त्या -त्या चित्रपटांमध्ये ते कर्तव्यदक्ष भूमिकेत दिसले. झपाटलेला हा मोठा प्रयोग होता. या चित्रपटात महेश यांची इन्स्पेक्टर महेश जाधव ही भूमिका होती.

ते 'डॅमिट' नेमकं आलं कुठून?

महेश यांना कॉलेजपासून डॅमिट म्हणायची सवय होती. त्यांनी जी एम हार्डलीची पुस्‍तक वाचली होती. त्यातील पात्र डॅमिट डॅमिट म्हणायचा. त्यामुळे महेश यांना डॅमिट म्हणायची सवय लागली.

लक्ष्मीकांत बेर्डेशी कशी झाली मैत्री?

महेश कोठारे यांच्या वडिलांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना नाटक करताना व्यासपीठावर पाहिलं होतं. एक नाटक होतं- झोपी गेलेला जागा झाला. या नाटकामध्ये बबन प्रभू नावाची भूमिका होती आणि त्यासाठी नवा नायक हवा होता. त्यावेळी महेश यांच्या वडिलांनी सुचवलं की, लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा मुलगा आहे, छान अभिनय करतो. त्याचा अभिनय बघायला जा. दुसऱ्या दिवशी महेश लक्ष्मीकांत बेर्डेचं नाटक बघायला गेले आणि थेट धुमधडाक्यासाठी त्याला कास्ट केलं. या चित्रपटासाठी लक्ष्याने फक्त १ रुपया मानधन घेतलं होतं.

तात्या विंचूची कहाणी

महेश कोठारे एकदा रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांच्या शोला उपस्थित होते. जर हा बाहुला जीवंत झाला तर… हा डोक्यात विचार सुरु असताना लक्ष्याला झपाटलेला चित्रपटासाठी निवडण्यात आलं.

महेश यांनी थरथराट, माझा छकुला, खरतनाक, दे दणादण, देवता, जबरदस्त, धडाकेबाज, झपाटलेला, शूभ मंगल यासारखे असंख्य चित्रपट करून मराठी सिनेप्रेक्षकांवर रुंजी घातलीय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news