Mahatma Gandhi Jayanti 2023 : जाणून घ्या महात्मा गांधी यांचे १० विचार

Mahatma Gandhi Jayanti 2023 : जाणून घ्या महात्मा गांधी यांचे १० विचार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महात्मा गांधी यांची आज (दि.२) जयंती. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. असहकार आंदोलनापासून दांडीयात्रेपर्यंत, मिठाच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी भारतीयांना एकत्र करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी सत्य, अहिंसा आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या जयंतीनिमीत्त त्यांचे १० विचार आपण पाहूया. (Mahatma Gandhi Jayanti 2023)

"अहिंसा ही मानवतेसाठी सर्वात मोठी शक्ती आहे. ती मनुष्याने तयार केलेल्या विनाशातील शक्तिशाली शस्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहे"
"प्रार्थनेत टेकलेल्या हजार डोक्यांपेक्षा एका कृत्याने एकाला आनंद देणे हे कधीपण चांगले"

"आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, त्यानंतर तुमच्यावर हसतील, नंतर ते तुमच्याशी लढतील आणि तेव्हा तुम्ही जिंकाल."

"चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा"

"कमजोर कधीही क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा बलवानाचा गुणधर्म आहे"

"तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता, पण माझ्या मनाला कधीही कैद करू शकणार नाही."

"असं जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असं शिका की तुम्हाला कायम जिवंत राहायचं आहे"

"कोणी भेकड प्रेम करू शकत नाही, प्रेम करणं हे शौर्याचं प्रतिक आहे"

"मौन हे सर्वात शक्तिशाली भाषण आहे. जग आपणास हळूहळू ऐकेल"

महात्मा गांधी यांनी मांडलेले आणि जगलेला विचारांची आजही प्रासंगिकता दिसून येते. संपूर्ण जगाला शांतता व अहिंसेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news