Maharashtra Rain Update : राज्यातील काही भागात पुढील चार ते पाच दिवस राहणार पावसाचा जोर कायम

Maharashtra Rain Update : राज्यातील काही भागात पुढील चार ते पाच दिवस  राहणार पावसाचा जोर कायम
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.कोल्हापूर, मुंबई,  ठाणे, नवी मुंबई, पालघर पुणे, नागपूर कोकणातील सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान विभागानं (IMD- India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार १२ सप्टेंबरपासून राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहील.  (Maharashtra Rain Update)  प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या माहीतीनुसार महाराष्ट्रात सोमवार (१२ सप्टेंंबर) पासून राज्यात चार ते पाच दिवस मान्सून सक्रीय राहील. कोकणसह  मुंबई, ठाणे भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. घाट भागात मुसळधार पाऊस पडु शकतो असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला (Maharashtra Rain Update) आहे. या परिसरातील नागरिकांना सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले  आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, महाराष्टारात आणखी चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहील. त्याचबरोबर उत्तराखंड, ओडिशा, बिहार, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह आणखी काही राज्यात तीन ते चार दिवस तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news