Maharashtra Politics : वऱ्हाड निघाले डाओसला; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका

Maharashtra Politics
Maharashtra Politics
Published on
Updated on

मुंबई पुढारी वृत्तसेवा :  युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (दिनांक १५-०१-२४) मातोश्री येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती . या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याचा लेखा जोखाच मांडला.. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना 'आज गोड बोलायचा दिवस आहे , पण त्यात सत्य सुद्धा बोललं पाहिजे.. असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेच्या दावोस दौऱ्यावरून हल्लाबोल केला .. यावेळी बोलताना 'घटनाबाह्य मुख्यमंत्री दावोसच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मागचा दौरा त्यांनी केला तेंव्हा २८ तासात ४० कोटी रुपये खर्च केले होते.. आज घटनाबाह्य मुख्यमंत्री दाओस दौऱ्याला ५० लोक घेऊन जात आहेत.. आधी ५० खोके होते, आता हे ५० लोक घेऊन जाताय'.. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्याच्या शिष्टमंडळ सदस्यांच्या संख्येवरून प्रश्न उपस्थित केले. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : परराष्ट्र मंत्रालयाने दौऱ्याला परवानगी दिली आहे का ?

यावेळी परदेश दौऱ्याविषयी परराष्ट्र मंत्रालय आणि वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागते , याची माहिती देतानाच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत . यावेळी बोलताना म्हणाले की 'घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यासाठी १० लोकांना परवानगी दिली असल्याची माहिती आहे..
त्यात आता इतर लोकांची परवानगी या केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे का? या दौऱ्यात मुख्यमंत्ऱ्यांसोबत उदयोग मंत्री, खासदार, माजी खासदार सुद्धा आहेत.. त्यामुळे ज्यांना गुवाहाटीत नेलं नाही , त्यांना आता दावोसला घेऊन जातायत असं वाटतंय, असा टोलाही लगावला..
तर माहिती देताना या दौऱ्याला MSRDC चे अधिकारी, ओएसडी चालले आहेत… उपमुख्यमंत्री यांचे सुद्धा OSD आहेत.. लोकांची यादी तुम्ही पाहिलं तर जनतेला धक्का बसेल.. केंद्र सरकारचा या सगळ्यावर अंकुश आहे कि नाही ? या दौऱ्यात काही दलाल सुद्धा आहेत अशी माहीती आहे.. जिथे ५-६ लोकांचं काम आहे तिथे एवढे लोक का घेऊन जाताय, बॅग उचलायला का ? असा हल्लाबोल केला.. तसंच या ५० लोकात कोणीही बिझनेसमेन नाही. त्यामुळे हा खर्च जरी स्वतः ते करणार असले तरी MEA ला हे माहिती आहे का? MEA ला हेच प्रश्न आहे कि हे तुम्हाला माहिती आहे का? आणि तुम्ही इतक्या लोकांना परवानगी दिली आहे का ? माझं आव्हान आहे की भाजपने रेस्कोर्स आणि दाओस दौऱ्यावर त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी असं आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका करतानाच भाजपला केलं आहे.

वऱ्हाड निघालला लंडनला तसा हा वऱ्हाड निघाला दावोसला

मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर असदित्य ठाकरे यांनी खोचक टीका करतानाच . तीन ते चार दलाल मित्रांना दावोसला सोबत नेलं जातंय . त्यांना सुद्धा सोबत घेऊन जाताय. दौऱ्यात ज्यांना परवानगी देण्यात आली आहे ते त्यांच्या सोबत बायोकाला घेऊन जाऊ शकतात. मित्र येथे मुलांना सुद्धा घेऊन जाताय.. यात महाराष्ट्र सरकारचा, सर्व सामान्यांनाचा पैसे जातोय.. त्यामुळे यांची स्थिती 'वऱ्हाड निघाला लंडनला, तसा हा वऱ्हाड निघाला दावोसला' अशी गत आहे . अस म्हणत टीका केली आहे..

घोड्यांच्या तबेल्यासाठी १०० कोटी रुपये का खर्च केले जातं आहेत ?

मुंबईतल्या ऐतिहासिक महालक्ष्मी रेसकोर्स बाबत देखील आदित्य ठाकरे यांनी सरकारला प्रश्न केले आहेत . ३ ते ४ रेसकोर्स च्या क्लब मधील सदस्य हे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करताहेत.. २२६ एक्कर जागा विभागली जाणार आहे.. काही एक्कर जागा ही रेसकोर्स साठी आणि इतर १२० एकर जागा थीम पार्क साठी राखीव ठेवली आहे.. आणि बाकी जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.. आणि घोड्यांच्या तबल्यासाठी १०० कोटी रुपये का खर्च केले जातं आहेत.. असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news