पुढारी ऑनलाईन डेस्क : मी सावधपणे बोलतोय, पंचामृत शब्द उच्चारताना तुम्हाला वाटायचे की मी अमृताकडे वळतोय, अशी मिश्लिक टिप्पणी आज (दि. ९) अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अर्थसंकल्प सादर करत असताना फडणवीसांनी पंचामृत ध्येयावर आमचा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. तसेच मी सावधपणे बोलतोय पंचामृत शब्द उच्चारताना तुम्हाला वाटायचे की मी अमृताकडे वळतोय, अशी मिश्लिक टिप्पणी फडणवीसांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे नाव अमृता आहे .त्यामुळे त्यांनी केलेल्या या टिप्पणीवर सभागृहात हंशा पिकला.
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात आपला दवाखाना या उपक्रमाला उत्स्फूर्त लाभला आहे. आता संपूर्ण राज्यांमध्ये हिंदू हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे ७०० आपला दवाखाना सुरू करण्यात येतील, त्याद्वारे मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणाही फडणवीसांनी यावेळी केली.
राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. त्यासाठी चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येतील. राज्यात सुमारे ८१ हजार आशा स्वयंसेविका साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत अशा स्वयंसेविकेचे सध्याचे मानधन ३५०० रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन ४७०० रुपये आहे या मासिक मानधनात प्रत्येकी दीड हजार रुपये एवढी वाढ करण्यात येत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले की, केंद्र शासनाने अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे मुंबई येथे युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल, त्यामध्ये बचत गटांना जागा देण्यात येईल. बचत गटांच्या माध्यमातून ३७ लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर हे विकसित करण्यात येईल. महिलांच्या आरोग्यासाठी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत चार कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येतील.
हेही वाचा :