Maharashtra Assembly Budget Session | ‘आरक्षण’ मुद्यावर विरोधक आक्रमक; विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी

Maharashtra Assembly Budget Session.1
Maharashtra Assembly Budget Session.1

पुढारी ऑनलाईन डेस्क:  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (दि.२६) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी  विरोधक आक्रमक झालेले दिसले. त्यांनी विधानभनाच्या पायऱ्यांवरच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आली. 'फसवणूक नको, आरक्षण द्या' अशी जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी विधानसभा परिसरात केली.  (Maharashtra Assembly Budget Session)

आशा सेविकांच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी : वडेट्टीवार

'राज्यातील आशा सेविकांच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी;' अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.२६) अधिवेशन सुरू होताच केली. या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा सेविकांच्या प्रश्नांवर अनेकवेळा वेळ दिला आहे. आशा सेविकांच्या बाबातीत सरकार सकारात्मक आहे."  (Maharashtra Assembly Budget Session)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news