जालना : जरांगे माघारी फिरले; सायंकाळी मराठा समाजासमाेर भूमिका मांडणार | पुढारी

जालना : जरांगे माघारी फिरले; सायंकाळी मराठा समाजासमाेर भूमिका मांडणार

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा सगळ्यात आधी मराठा समाजाला सांगतो संचारबंदी लावण्यात आल्याने मुंबईकडे जाता आले नाही. आता कुणाला अडचणीत आणायचं नाही, म्हणूनच माघारी फिरलो. आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजता माझी भूमिका समाजासमोर मांडणार आहे. धरणे आंदोलन गावा गावात सुरू करणार असल्‍याचे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अंतरवालीत आमरण उपोषन सुरुच राहणार, आजच्या कॅबिनेटमध्ये सगेसोयऱ्यांची अमबजावणी करा, मराठे मागे हटणार नाहीत. आणखी तुमच्या हातून वेळ गेली नाही सगे सोयऱ्याची अमबजावणी करा. माझ्या आमरण उपोशनाबाबत आज संध्याकाळी ५ वाजता निर्णय घेणार.

आम्ही शांततेत रास्ता रोको आंदोलन केले असताना आमच्यावर गुन्हे का दाखल केले. शांततेत मुंबईला जात असताना का अडवलं, सगे सोयरे कायदा करा. तुम्ही सागर बंगला उघडा ठेवला असता तर तुमची इमेज वाढली असती आम्ही कधी म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी इगो ठेवला मुख्यमंत्र्यांना आम्ही काहीही म्हणालो नाही.

मुख्यमंत्री आणि फडणवीस यांनी आता शहाणं व्हावं आणि कायदा करावा. मी कुणाचाही मुलाहीजा ठेवत नाही. सगळ्यांचे नाव उघड करणार. पुढे जाता येईना पुढे पोलिस उभे केले लोक पायी चालतात. लोक थकलेत सुविधा नव्हत्या. त्यामुळे माघारी फिरलो असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

माझी मुंबईला जाण्याची भूमिका हट्टी होती, तर मग आम्ही शांततेत रास्ता रोको करून आमच्यावर गुन्हे दाखल केले ही तुमची भूमिकाही हट्टी पणाची नाही का 16 दिवस उपोषणा दरम्यान सरकारची वाट पाहिली पण कुणी आलं नाही.

आमचे जाहीर केलेले आंदोलन पुढे होणार की नाही ते बघू, आम्हाला राज्यात शांतता ठेवायची आहे. कोर्टाच्या हे लक्षात येत आहे. आमचं आरक्षण आम्हाला द्या. आमचं आंदोलन मागे होईल. मुख्मंत्री शब्द पलटू शकत नाहीत, आमचं आरक्षण आम्हाला द्या. आमचा आंदोलन बंद होणार नाही.

तुम्ही डाव खेळणं बंद करा. आमच्याकडे सुविधा नसल्याने माघारी फिरलो. अंतरवालीची पुनरावृत्ती करायच्या नादाला लागू नका. जुने सहकारी आरोप करतात त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही. समाजात विष कालवायला असे कुठे आरोप करत असतात का असं जरांगे म्‍हणाले.

राष्ट्रवादीचा सपोर्ट असल्‍याचा काही संबंध नाही. सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात आहेत. मग काढा ना शोधून. माझ्यावर सगळे आरोप झाले. मी फक्त समाजाचा आहे. माझ्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माझ्या सहकाऱ्यांना अटक करणे बंद करा. मराठ्यांशी बोलून आंदोलनावर तोडगा काढा. सग्या सोयऱ्यांवर बोला.

तिर्थपुरीत बस जाळपोळ झाली. माझा जाळपोळला विरोध आहे. हिंसक आंदोलन करू नका. मी याचं समर्थन करत नाही. साखळी उपोषण सुरू होणार असल्‍याची त्‍यांनी जाहीर केल.

हेही वाचा :

Back to top button