Mahadev App Case | ‘महादेव ॲप’प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ३२ जणांविरुद्ध गुन्हा

Mahadev App Case | ‘महादेव ॲप’प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ३२ जणांविरुद्ध गुन्हा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील माटुंगा पोलिसांनी 'महादेव ॲप' प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांना महादेव या सट्टेबाज ॲप प्रमोटरसह अन्य ३२ जणांविरोधी गुन्हा दाखल केला. फसवणूक आणि जुगार खेळल्याप्रकरणी संबंधित संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Mahadev App Case)

यापूर्वी महादेव बेटिंग ॲप (Mahadev App Case) प्रकरणी ईडीने कुरेशी प्रोडक्शन हाऊससह मुंबईत ५ ठिकाणी छापेमारी केली होती. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. आता ED ने बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर कुरेशी हाऊसवर छापा टाकला आहे. कुरेशी प्रोडक्शनच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, महादेव बुक ॲप प्रकरणी ईडीने शुक्रवारी (दि.३) कुरेशी प्रॉडक्शनसह आसपासच्या इतर पाच ठिकाणी देखील छापे टाकले होते. त्यानंतर मुंबईतील माटुंगा पोलिसांनी महादेव ॲप' प्रकरणात ही मोठी कारवाई केली आहे. (Mahadev App Case)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news