भोपाल, पुढारी ऑनलाईन : मध्यप्रदेश राज्यातील खरगौन शहारात रविवारी रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घडलेल्या हिंसाचारानंतर शहराच्या तीन भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मिरणुकीदरम्यान काही उपद्रवी लोकांकडून दगडफेक आणि आग लावण्याचा घटना घडली. त्यामध्ये काही वाहनांना आग लावण्यात आली. या घटनेनंतर प्रशासनाने तीन भागांमध्ये कर्फ्यू लागू केलेला आहे. तसेच कलम १४४ लागू केलेली आहे. हिंसेवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा वापर केला.
या दगडफेकीमध्ये खरगौनचे पोलीस अधिक्षक सिद्धार्थ चौधरी आणि इतर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. खरगौनचे जिल्हाधिकारी अनुग्रह पी यांच्या आदेशावरून पूर्ण शहरात सीआरपीसीचे कलम १४४ लागू करण्यात आली आहे. तालाब चौक आणि टवडी या परिसरासहीत शहरात कर्फ्यू लागू केलेले आहे.
अधिक माहितीनुसार रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या प्रारंभी अल्पसंख्य बहुल परिसरातून दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये ४ लोक जखमी झाल्याची प्राथमिक सुचना आहे. यामध्ये पोलीस कर्मचारीदेखील आहेत. शहरात कर्फ्यू लागू केल्यानंतर नागरिकांना घरातून बाहेर येण्यास मज्जाव करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
मध्यप्रदेश राज्यामधील खरगौनच्या तालाब चौक, गौशला मार्ग, मोतीपुरा, स्टेडियम मागे, टाॅवर क्षेत्रात हे कर्फ्यू लागू करण्यात आले होते. ४ घरांमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. घटनेचं गांभीर्य विचार घेता शहारात जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. असं सांगितलं जातं आहे की, रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरणणुकीत डीजे लावल्यामुळे मुस्लीम समुदाच्या लोकांनी दगडफेक करण्यात आली.