Madhya Pradesh CM : भाजपच्या धक्कातंत्रामागे ‘आरएसएस’चा अदृश्य हात, रा.स्व.संघाने केले मोहन यादव यांचे अभिनंदन

Madhya Pradesh CM
Madhya Pradesh CM
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपने मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले. यानंतर मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याबाबत अनेक दिवसांपासून खलबते सुरु होती. शिवराज सिंह चौहान यांची मुख्यमंत्रिपदासाठी प्रमुख दावेदारी असतानाच भाजपने मोहन यादव हा नवा चेहरा समोर आणत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. 'आरएसएस'नेच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. यादव यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी घोषणा झाल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे अभिनंदन केले आहे. एका समारंभात त्यांनी फोन उचलून अभिनंदनही स्वीकारले. Madhya Pradesh CM)

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. अखेर विधीमंडळातील पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. शिवाय मध्य प्रदेशात दोन उपमुख्यमंत्रीही असतील. यामध्ये जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांचा समावेश आहे. जगदीश देवरा हे मल्हारगडचे आमदार आहेत आणि राजेंद्र शुक्ला बिजावरचे आहेत. याशिवाय विधानसभा अध्यक्षपदासाठी नरेंद्र सिंह तोमर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. Madhya Pradesh CM)

कोण आहेत मोहन यादव? Madhya Pradesh CM)

मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे आमदार आहेत. यादव हे रा. स्वं. संघाच्या जवळचे मानले जातात. यादव यांनी 2013, 2018 आणि 2023 मध्ये उज्जैन दक्षिण मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. मोहन यादव यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्रिपद भूषवले आहे. 2013 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. मोहन यादव हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. 1984 मध्ये मोहन यादव यांची विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री म्हणून निवड झाली. शिवाय ते अनेकदा वादात अडकले आहेत. 2020 मध्ये पोटनिवडणुकीत असभ्य भाषेचा वापर केल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर एक दिवस प्रचार करण्यास बंदी घातली होती. (Madhya Pradesh CM)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news