Devendra Fadnavis On Article 370: कलम ३७० रद्दमुळे आज भारताचा विजय – उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

Devendra Fadnavis On Article 370: कलम ३७० रद्दमुळे आज भारताचा विजय - उपमुख्यमंत्री फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क: जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्दबाबत केंद्राच्या निर्णयावर कोर्टाने आज (दि.११) शिक्कामोर्तब केला आहे. कोर्टाच्या या निर्णयाने जम्मू काश्मीरमध्ये नवीन पहाट झाली आहे. हा भारताचा खऱ्या अर्थाने विजय आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नागपूर येथून ते माध्यमांशी बोलत होते. (Devendra Fadnavis On Article 370)

पुढे ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे कलम ३७० पुन्हा येण्याची शक्यता संपली आहे. काश्मीरच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला असून आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहला जाईल. या निर्णयामुळे आज एकसंघ भारत प्रस्थापित झाला आहे. तसेच खऱ्या अर्थाने जम्मू काश्मीरमधील दहशतवाद कमी होऊन विकास होण्यास मदत होईल, असेही मत फडणवीस यांनी मांडले. (Devendra Fadnavis On Article 370)

विकास कामांना विरोध, हीच ठाकरेंची निती-फडणवीस

बाळासाहेब ठाकरेंची मागणी पूर्ण करण्याचे काम पीएम मोदी यांनी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना या संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही. विकास कामांना विरोध करणे हीच ठाकरेंची निती असल्याची टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. (Devendra Fadnavis On Article 370)

हेही वाचा:

Back to top button