China Deflation | आश्चर्यच! जग महागाई तर चीन स्वस्ताईची खाईत; दर पडल्याने ‘ड्रॅगन’ची अर्थव्यवस्था संकटात | पुढारी

China Deflation | आश्चर्यच! जग महागाई तर चीन स्वस्ताईची खाईत; दर पडल्याने 'ड्रॅगन'ची अर्थव्यवस्था संकटात

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरात महागाईची समस्या सतावत आहे, त्यामुळे विविध देशातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी धडपडत आहेत. पण याच्या नेमकी उलट स्थिती चीनमध्ये निर्माण झालेली आहे. चीनमध्ये वस्तूंचे दर पडलेले आहेत, याला अर्थशास्त्राच्या भाषेत Deflation म्हणतात. महागाईच्या उलट ही स्थिती असते.

चीनचा नोव्हेंबरमधील Consumer Price Index (CPI) हा ०.५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. नोव्हेंबर २०२०नंतरचा हा निच्चांक आहे. नोव्हेंबरमधील CPI हा ०.१ टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात CPI हा ०.५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. ही बातमी CNNने दिली आहे.

वस्तू आणि सेवांना मागणीच नसल्यामुळे Deflationची परिस्थिती ओढवते. त्यामुळे मागणीत वाढ व्हावी आणि वस्तू, सेवांचे दर अधिक खाली जाण्यापासून रोखावेत हा दबाव आता सरकारवर आहे.

चीन ही जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. चीनमध्ये रिअल स्टेट उद्योग पूर्ण संकटात आहे. या बरोबरीने चीनमध्ये तरुणांतील बेरोजगारी ही मोठा आर्थिक समस्या बनली आहे. त्यातून अर्थव्यवस्थेतील मागणी घटलेली आहे.

चीनमध्ये CPI कमी घटण्याची सुरुवात फेब्रुवारीमध्ये झाली आणि हा CPI जुलैपासून नकारात्म व्हायला सुरुवात झाली. ऑगस्टमध्ये यात थोडी सुधारणा झाली, पण ऑक्टोबरमध्ये CPI पुन्हा घटू लागला. सुरुवातीला CPIची घट ही फक्त वस्तूंपुरती मर्यादित होती, ती आता सेवाक्षेत्रातही पोहोचली आहे.  चीनची मध्यवर्ती बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चीनचे गर्व्हनर पॅन गाँगशेंग यांनी येत्या काही महिन्यात किंमतीत सुधारणा होतील असा आशावाद व्यक्त केला आहे.

हेही वाचा

Back to top button