Madhuri Dixit : माधुरीची भावाच्या पार्टीत डॉ. नेनेंशी झाली भेट, ३ महिन्यांनी थेट प्रपोझ केलं

dr nene- madhuri dixit
dr nene- madhuri dixit

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची भेट कशी झाली, त्यांच्या प्रेमाचे किस्से आणि निर्माते म्हणून हे या कपलचा पंचक हा चित्रपट भेटीला येत आहे, त्याबद्दल या कपने 'पुढारी न्यूज'शी बातचीत केली. (Madhuri Dixit ) डॉ. नेनेंशी पहिल्या भेटीत काय घडलं याविषयी माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने यांनी गप्पा मारल्या. (Madhuri Dixit )

संबंधित बातम्या – 

डॉ. श्रीराम नेनें म्हणाले, पंचक हा चित्रपट ५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात दिग्गज कलाकार आहेत. यात धमाल कॉमेडी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा विषय अंधश्रद्धेविषयी आहे. या कथेला कोकणातील आणि मालवणी ठसका आहे.

माधुरी म्हणाली, मालवणी विनोदी कथा असल्याने स्क्रिप्ट आवडली होती. पाऊस आला, वादळ आलं तरी टीमने अविरतपणे काम केलं. वेळेत सर्व शूटिंग संपलं, ही खासियत म्हणावी लागेल. २८ दिवस शूटिंग सुरू होते. निर्माते म्हणून आम्ही खूप आनंदित आहोत. सर्व टीमने मेहनत घेतली आहे. हा विषय जरा हटके आहे. आम्ही दोघांनी कामे वाटून घेतली होती.

डॉ. नेने म्हणाले, सावंतवाडीतील खूप सुंदर लोकेशन्स आहेत. दिग्दर्शकांनी उत्तमरित्या ते दाखवलंय. प्रत्येक पात्राबद्दल आपुलकी आहे. तेजश्री पात्र खूप सुंदर आहे. दिलीप, भारती, तेजश्री या सर्वच कलाकारांनी आपला जीव ओतलाय. आजी, काका अशी नाती सुंदरपणे दाखवली आहेत. या चित्रपटात १६ कलाकार आहेत. आमची चित्रपटाची संपूर्ण टीम एक कुटूंब बनले आहे. लोकं इतकी चांगली होती की, सर्व काही सोप्पं झालं. ८० लोकं सेटवर होती. आधी माधुरीने होमवर्क, रिसर्च केलं. क्रिएटिव्ह डिझाईन्सदेखील केलं. आम्ही दोघांनी मिळून कास्टिंग केलं. आमच्या दोघांमध्ये आदर आहेच. मी सायन्समधून आलो आहे. माधुरी आर्ट्समधून आलीय. त्यामुळे आर्टमध्ये काय चाललंय, हे जाणून घ्यायला आवडतं.

माधुरी म्हणाली, डॉ. नेनेंना आर्ट्स जगात काय चाललयं हे पाहायला आवडतं. आर्टसमध्ये काय चाललंय, हे त्यांना पाहायला आवडतं. आमचे ध्येय सारखे आहेत.

पहिल्या भेटीत काय घडलं?

माधुरी – डॉ. नेने यांच्या पहिल्या भेटीत काय घडलं, हे सांगताना माधुरी म्हणाली- "माझ्या भावाच्या घरात पार्टी होती. तेव्हा भाऊ काय बोलला नाही. मित्र वगैरे सगळ्यांना पार्टीला बोलावलं होतं. तेव्हा डॉ. नेनेंशी भेट झाली.

डॉ. नेने म्हणाले, आम्हा दोघांनाही काही माहिती नव्हतं की, काय सेटिंग आहे. आमच्या दोघांची भेट झाली. मग आम्ही माऊंटन बाईकिंग वगैरे केलं. मी माधुरीला प्रपोझ केलं. तीन महिन्यांनी लग्न झालं.

डॉ. नेने यांनी सांगितलं की, माधुरीकडून आणि मुलांकडून रोज शिकायला मिळतं. कॉलेजमध्ये, युएसमध्ये असताना जेवण करायला शिकलो. लग्न झाल्यानंतर आम्ही दोघेही स्वयंपाक करायला हळूहळू शिकलो. मराठी सिनेमात मजा आहे पण त्याला अर्थ पण असतो. खूप प्रसिद्ध कलाकार आणि दिग्दर्शक घेऊन चित्रपट बनवणे हे आव्हानात्मक होतं, असं म्हणायला हरकत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news