लम्पी प्रकोप : पुणे जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित
पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिह्यातील अनेक ठिकाणच्या गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रण आणण्यासाठी पुणे जिल्हा 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घोषित केले आहे. जिह्यातील गोवंशीय जनावरांची वाहतूक, तसेच मांस वाहतूक, खाद्य वाहतूक यांवर विविध प्रकारचे निर्बंध लादण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे. जिह्यातील गोवंशीय जनावरांमध्ये (म्हैस वर्गीय वगळून) लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला असल्याचे जाणवताच केंद्र शासनाचे पथक राज्यात दाखल झाले आहे.
पशुसंवर्धन, विभागाच्या रोग अन्वेशन विभागाने शिरूर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली, पुरंदर आणि मुळशी तालुक्यातील गोवंशीय जनावरांचे नमुने तपासले असता जनावरांमध्ये पुन्हा लम्पी रोगाची लक्षणे आढळून आली आहे. प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी संपूर्ण पुणे जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील साडेआठ लाख जनावरांपैकी सुमारे दीड हजार जनावरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाला असून , ४३ जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यात या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम जोरात असून , पशु बाजारांमध्ये लसीकरण केलेल्या जनावरांना प्रवेश मिळणार आहे.
हेही वाचा :