पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील लुधियाना येथील एटीएम कॅश कंपनी सीएमएसमधील ८.४९ कोटींच्या दरोड्याची पोलिसांनी उकल केली आहे. दरोड्यात सहभागी ६ दरोडेखोरांना अटक करून ५ कोटी जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासात सीएमएस कंपनीच्या कर्मचाऱ्यासह एका महिलेने हा संपूर्ण प्रकार घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. या घटनेत एकूण १० जणांचा सहभाग होता. त्याची मास्टरमाईंड 'डाकू हसिना' मनदीप कौर अद्याप फरार आहे. तिच्या विरोधात लुकआउट नोटीस (LOC) जारी करण्यात आले आहे. या दरोड्यात मनदीप कौरसोबत तिचा पती आणि भाऊही सहभागी आहे. (Ludhiana Money Heist)
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी पाच कोटी सातशे रुपये रोख, सीएमएस कंपनीची कार, गुन्ह्यात वापरलेली कार, तीन रायफल, १२ बोअर, धारदार शस्त्रे, हायड्रोलिक शिडी, निळ्या रंगाची बॅग जप्त केली. हातोडा, छिन्नी, पक्कड, स्क्रू ड्रायव्हर यासह इतर साधने जप्त करण्यात आली. या घटनेचा गुन्हेगार दुसरा कोणी नसून त्याच कंपनीत गेल्या चार वर्षांपासून काम करणारा कर्मचारी होता. त्याने आपल्या एका महिला मैत्रिणीसोबत ही घटना घडवली. (Ludhiana Money Heist)
कसा रचला कट (Ludhiana Money Heist)
या घटनेचे २ मुख्य सूत्रधार आहेत. पहिली व्यक्ती म्हणजे मनदीप कौर या महिलेला पोलिसांनी 'डाकू हसिना' असे बिरुद लावले आहे आणि दुसरा मनजिंदर मणी. मणी हा याच कंपनीत ४ वर्षापासून कर्मचारी आहे. त्यांनी आणखी आठ आरोपींना श्रीमंत बनवण्याचे स्वप्न दाखवून हा गुन्हा केला.
दरोड्याच्या घटनेसाठी दोन वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करण्यात आला. मनजिंदर मणी आणि २ बाइकवर एकूण ५ लोक होते एकत्र होते. तर मनदीप कौर क्रूझ कारमध्ये आणि तिच्यासोबत ४ दरोडेखोर अशा पद्धतीने कटाची दोन पद्धतींमध्ये विभागणी करण्यात आली होती.
मनजिंदर मणी सीएमएस कंपनीत काम करायचा त्यामुळे त्याला तेथील सर्व गोष्टींची माहिती होती. इथे रोकड कोणत्या स्थितीत ठेवली आहे, हे त्याला माहीत होते. सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीमध्ये कोणते लूज पॉइंट आहेत याची माहिती काढून मनदीप कौरसोबत त्याने हा कट रचला. जानेवारी महिन्यापासून या कटाचे नियोजन सुरू होते.
शनिवार आणि रविवारी एटीएममध्ये पैसे टाकले जात नाहीत हे मनजिंदर मणी याला माहीत होते. त्यामुळे कंपनीकडे शुक्रवारी जास्त रोकड असते. यासाठी शुक्रवारचा दिवस दरोड्यासाठी निवडण्यात आला.
या १० आरोपींपैकी एकानेही मोबाईल वापरला नव्हता. या कारणास्तव, पोलिस त्यांचे लोकेशनद्वारे शोधू शकले नाहीत.
लुटीची मास्टरमाइंड मनदीप कौरच्या भावाने इंस्टाग्रामवर नोटांची रील पोस्ट केली होती. ज्यामध्ये ५००-५००0 रुपयांच्या नवीन नोटांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेले दिसत होते. त्यामुळे पोलिसांनाही त्याच्या गुन्ह्याबद्दल संशय आला.
दरोडेखोरांनी जी कॅश व्हन लुटली तिचा फ्लिकर चालू होता. ज्या बद्दल केवळ तज्ज्ञांना किंवा वाहन चालकालाच माहिती असते. त्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यावार संशय बळवला. घटनेच्या दिवशीही मनजिंदर मणी हा वाहन चालवत होता.
कंपनीने सांगितलेली लुटीची रक्कम आणि दरोडेखोरांच्या कबुलीनंतरची रक्कम यात तफावत आढळून आली आहे. २ बॅगमध्ये ३-३ कोटी तर तिसऱ्या बॅगमध्ये डीव्हीआर घेतल्याचे दरोडेखोरांनी सांगितले. पण, कंपनीने आधी ७ कोटी जाहीर केले आणि नंतर ते ८.४९ कोटी असल्याचे सांगितले. सर्व दरोडेखोरांना पकडल्यावर संपूर्ण रक्कम स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मनजिंदरला रातोरात श्रीमंत व्हायचे होते. त्यामुळेच त्याने मनदीप कौरसोबत हा कट रचला. अन्य आरोपींचा कोणताही गुन्हेगारी इतिहास असल्याचे समोर आलेले नाही. अशा स्थितीत सर्वांना श्रीमंत करण्याचे स्वप्न दाखविण्यात आले.
दुसरीकडे मीडियाशी बोलताना पोलीस आयुक्त मनदीप सिद्धू म्हणाले की, ही घटना घडली तेव्हा सीएम भगवंत मान यांनी नाराजी व्यक्त केली की एवढी मोठी घटना कशी घडली? मात्र, यानंतर त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यामुळे या घटनेचा तपास त्वरीत लावण्यात यश आले
डीजीपी गौरव यादव यांच्यासह सीएम भगवंत मान यांनी हे प्रकरण सोडवल्याबद्दल ट्विट केले. मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दुसरीकडे, डीजीपी गौरव यादव म्हणाले की, दरोड्याच्या प्रकरणात मोठी वसुली करण्यात आली आहे.
अधिक वाचा :