लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान, मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात

लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान, मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १ ऑगस्ट रोजी पुण्यात राष्ट्रीय टिळक पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, रोखरक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराची रक्कम नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगे प्रकल्पाला देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक हे भारतीयांच्या कपाळावरील टिळा असल्याचे अभिमानाने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. पुरस्कार घेताना मी उत्साही आणि भावुक आहे. आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे. लोकमान्य टिळक स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या माथ्यावरचा टिळक आहेत, त्याचबरोबर अण्णा भाऊ यांनी समाजसुधारणेसाठी दिलेले योगदान असाधारण आहे. मी दोघांनाही श्रद्धापूर्वक नमस्कार करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आजचा पुरस्कार माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. आजचा दिवस हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या पुरस्काराचा निधी नमामि गंगे प्रकल्पाला देणार आहे. या पुरस्कारानंतर माझी जबाबदारी वाढली आहे. महात्मा गांधींनी टिळकांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले. टिळकांनी शिवजयंतीचे आयोजन सुरू केल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news