मोठी बातमी : निवडणूक काळात बँकांना दररोज सादर करावे लागणार ‘एसटीआर’, जाणून घ्‍या सविस्‍तर

मोठी बातमी : निवडणूक काळात बँकांना दररोज सादर करावे लागणार ‘एसटीआर’, जाणून घ्‍या सविस्‍तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ( दि.१६ मार्च ) निवडणूक तारखांची घोषणा केली. (Lok Sabha Election date 2024) लोकसभा निवडणूक २०२४ साठी ७ टप्प्यांत मतदान होणार आहे. निवडणूक काळात बँकांना दररोज 'एसटीआर' (संशयास्पद व्यवहार अहवाल) दाखल करण्‍याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. जाणून घेवूया याविषयी सविस्‍तर…

पैशाची मागणी अचानक वाढली आहे का?, याबाबत बँका माहिती घेतील

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्‍हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पैशाच्‍या गैरवापर प्रभावीपणे रोखण्‍यासाठी आणि निष्पक्ष निवडणुका घेण्‍यासाठी आम्‍ही काही पावले उचलेली आहे. यामध्‍ये बँकांची भूमिका महत्त्‍वाची ठरणार आहे. बँकेच्‍या एखाद्‍या शाखेत पैशाची मागणी अचानक वाढली आहे का, याबाबतही बँका माहिती घेतील. तसेच वॉलेटद्वारे पेमेंटमध्ये अधिक मागणी असल्यास NPCI त्‍यावर लक्ष ठेवेल. आम्ही वॉलेटचे सर्व व्यवहार पाहणार आहोत. बँका जवळजवळ दररोज संशयास्पद व्यवहारांचे अहवाल ( एसटीआर ) पाठवतील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

निवडणुकीदरम्यान पैशाच्या गैरवापराला बसणार चाप

आम्ही सर्व अंमलबजावणी संस्थांच्या मदतीने निवडणुकीदरम्यान पैशाच्या गैरवापरावर प्रतिबंध केला जाईल, निवडणूक काळातील आर्थिक व्‍यवहारांवर एनपीसीआय, जीएसटी, बँका यासारख्या सशक्त एजन्सी आणि संस्था संशयास्पद व्यवहारांचा मागोवा घेतील.निवडणूक काळातील पैसे आणि दारु वाटप, मोफत वस्तू वितरण रोखण्यासाठी कठोर उपाययोजनाचे आंदश देण्‍यात आले आहते. संवेदनशील वस्तू आणि मोफत वस्तूंच्या बेकायदेशीर वितरणातवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. बेकायदेशीर ऑनलाइन रोख हस्तांतरणावर कडक नजर ठेवली जाईल. या माध्‍यमातून निवडणूक काळात पैशाच्‍या गैरवापरला चाप बसेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

सात टप्प्यांत मतदान, ४ जून रोजी निकाल

निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज शनिवारी (दि.१६) लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखांची घोषणा केली. (Lok Sabha Election date 2024) लोकसभा निवडणूक २०२४ साठी ७ टप्प्यांत मतदान होईल आणि ४ जून रोजी मतमोजणी होईल. लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी, पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी, सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी आणि सातव्या टप्प्यांतील मतदान १ जून रोजी होईल आणि मतमोजणी ४ जून होईल, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

नवीन महिला मतदारांची संख्या नवीन पुरुष मतदारांच्या तुलनेत 15% अधिक

देशात पुरुष मतदारांची संख्या 49.7 कोटी आहे, तर 2019 मध्ये ही संख्या 46.5 कोटी होती. दुसरीकडे, महिला मतदारांची संख्या ४७.१ कोटी आहे, ही आकडेवारी मागील लोकसभा निवडणुकीत ४३.१ कोटी इतकी होती. मतदार यादीतील लिंग गुणोत्तरामध्ये सकारात्मक वाढ झाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाने दिला आहे. देशाच्या लोकशाही संरचनेत महिलांची वाढती भूमिका देखील यातून सूचित होते. मतदार यादीत 2.63 कोटीहून अधिक नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी १.४१ कोटी महिला मतदार आहेत तर १.२२ कोटी पुरुष मतदार आहेत. अशा प्रकारे नवीन महिला मतदारांची संख्या नवीन पुरुष मतदारांच्या तुलनेत 15% अधिक आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news