Lok Sabha Elections 2024 : अजित पवार गटाची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Elections 2024 : अजित पवार गटाची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

भोपाळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) दृष्टीने राज्यात अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून आमचे सूर कसे जुळले आहेत, असे चित्र असले तरी अरुणाचल प्रदेशात मात्र या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर भाजपकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. लिका सय्या हे अजित पवार गटाचे उमेदवार (Lok Sabha Elections 2024) आहेत. त्यांच्यावर भाजपने हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना सुरक्षा द्या, अशी मागणी पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आणि अरुणाचल प्रदेशचे प्रभारी संजय प्रजापती यांनीही यावेळी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news