Lok Sabha Election 2024 Voting : पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर हाणामारी; भाजप उमेदवार आणि तृणमूल नेता एकमेकांना भिडले

Lok Sabha Election 2024 Voting
Lok Sabha Election 2024 Voting

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान जंगीपूर येथील मतदान केंद्रावर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) बूथ अध्यक्ष आणि भाजप उमेदवार धनंजय घोष एकमेकांना भिडले. मतदान केंद्रावरील हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणुक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यात आज ७ मे रोजी ११ राज्यांमधील ९३ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण १३३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत आहे. काही लोकसभेच्या जागांवर मतदान ४ वाजता संपेल. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातून १०, गुजरातमधून २५, कर्नाटकातून १४, महाराष्ट्रातील ११, मध्य प्रदेशातून ९, आसाममधून ४, बिहारमधून ५, छत्तीसगडमधून ७, पश्चिम बंगालमधून ४, दमण दीव आणि दादरा-नगर हवेलीच्या २ जागांवर मतदान होत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news