केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस नेते राहुल गांधी.
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस नेते राहुल गांधी.

Lok Sabha election 2024 : म्युच्युअल फंडमध्‍ये ३.८१ कोटींची गुंतवणूक, राहुल गांधींच्‍या नावावर एकुण मालमत्ता किती?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्‍यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्‍या मालमत्तेचा तपशील दिला आहे.

राहुल गांधींच्‍या नावावर एकूण 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता

राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्‍या माहितीनुसार, त्‍यांची शेअर बाजारात एकूण ४.३ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. यातील ३.८१ कोटी रुपये म्युच्युअल फंड गुंतवणूक आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 55,000 रुपये रोख आणि एकूण उत्पन्न 1,02,78,680 रुपये (1.02 कोटी) घोषित केले आहे. जंगम आणि स्थावर अशी एकूण २० कोटी रुपयांची मालमत्ता राहुल गांधी यांच्‍या नावावर आहे.

राहुल गांधी यांच्याकडे 15.2 लाख रुपयांचे सोन्याचे रोखेही आहेत. त्यांची राष्ट्रीय बचत योजना, पोस्टल बचत आणि विमा पॉलिसींमध्ये 61.52 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. प्रतिज्ञापत्रानुसार राहुल गांधी यांच्‍या नावावर ४.२ लाखांचे दागिने आहेत.त्यांच्या जंगम मालमत्तेचे एकूण मूल्य 9.24 कोटी रुपये आहे, तर त्यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण मूल्य सुमारे 11.14 कोटी रुपये आहे. त्यांच्या नामांकनासह सादर केलेल्या तपशीलानुसार त्यांची एकूण संपत्ती 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. राहुल गांधींवरही सुमारे ४९.७ लाख रुपयांचे दायित्व आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड येथे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली. या मतदारसंघातील ते  विद्यमान खासदार आहेत. 2019 लोकसभा निवडणूक त्‍यांनी  चार लाखांहून अधिक मतांच्या फरकाने जिंकली हाेती. यंदाच्‍या सीपीआयच्या ज्येष्ठ नेत्या ॲनी राजा आणि भाजपचे केरळ अध्यक्ष के सुरेंद्रन यांच्याशी त्‍यांचा सामना होणार आहे.  केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागांवरून खासदार निवडण्यासाठी एकाच टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news