Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर, YS शर्मिला कडप्पामधून निवडणूक लढवणार | पुढारी

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर, YS शर्मिला कडप्पामधून निवडणूक लढवणार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १७ तर आंध्र प्रदेश विधानसभेच्‍या ११४ उमेदवारांची यादी आज (दि.२ एप्रिल) जाहीर केली आहे.  पक्षाने वायएस शर्मिला रेड्डी यांना  कडप्पा मतदारसंघातून उमेदवारी देण्‍यात आली आहे.

काँग्रेसकडून आतापर्यंत लोकसभेच्‍या २४० उमेदवारांची घोषणा

यापूर्वी सोमवारी १ एप्रिल रोजी काँग्रेसने जाहीर केलेल्‍या यादीत महाराष्‍ट्रातील अकोला मतदारसंघातून अभय काशिनाथ पाटील तर कडियाम काव्य यांना तेलंगणातील वारंगळ मतदारसंघातून उमेदवारी देण्‍यात आली हेती. निवडणूक लढवणार आहेत.काँग्रसने आतापर्यंत लोकसभेच्‍या २४० उमेदवारांची केली घोषणा आहे. लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

पक्षाने आज ( दि.२ एप्रिल )जाहीर केलेल्‍या उमेदवारांच्‍या यादीनुसार, वायएस शर्मिला रेड्डी आंध्र प्रदेशातील कडप्पा येथून तर एमएम पल्लम राजू काकीनाडा येथून निवडणूक लढवणार आहेत. मोहम्मद जावेद यांना किशनगंजमधून आणि तारिक अन्वर यांना बिहारमधील कटिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

Back to top button