हम है माेदी का परिवार : वाराणसीत स्‍थानिकांनी घराबाहेर लावले पोस्‍टर्स

वाराणसीतील स्‍थानिकांनी आपल्‍या घराबाहेर हम है मौदी का परिवार असे पोस्‍टर्स लावले.
वाराणसीतील स्‍थानिकांनी आपल्‍या घराबाहेर हम है मौदी का परिवार असे पोस्‍टर्स लावले.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुटुंब नाही, अशी बोचरी टीका राष्‍ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी केली होती. यानंतर भाजप नेत्‍यांनी सोशल मीडिया प्रोफाइलवर त्‍याच्‍या नावासमोर (बायो) 'मोदी का परिवार' असे घोषवाक्‍य जोडले होते. आता यानंतर आज (दि. ५ मार्च) पंतप्रधान मोदी यांच्‍या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील स्‍थानिकांनी आपल्‍या घराबाहेर 'हम है माेदी का परिवार', असे पोस्‍टर्स लावले, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. ( Locals put "Hum Hain Modi Ka Parivar" posters outside their house in Varanasi. )

भाजपकडून "मोदी का परिवार" मोहीम सुरु

लोकसभा निवडणुकीपूर्वी परिवारवादावरून देशात नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुटुंबच नाही, अशी टीका केली होती. त्यानंतर संपूर्ण देश माझे कुटुंब आहे, असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. यानंतर देशातील प्रमुख भाजप नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी "मोदी का परिवार" मोहीम सुरु केली आहे. भाजप नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एक्सवर त्यांचे बायो बदलून नावापुढे "मोदी का परिवार" असे लिहीले आहे. ( Locals put "Hum Hain Modi Ka Parivar" posters outside their house in Varanasi. )

आज (दि. ५ मार्च) पंतप्रधान मोदी यांच्‍या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील स्‍थानिकांनी आपल्‍या घराबाहेर 'हम है माेदी का परिवार' असे पोस्‍टर्स लावले.

शनिवारी राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर त्यांच्या कुटुंबाबाबत वैयक्तिक टीका केली होती. त्यानंतर सोमवार,४ मार्च रोजी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण देश त्यांचा कुटुंब आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेण रीजेजु, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार मनोज तिवारी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी एक्सवर त्यांच्या नावात बदल केला. नेत्यांनी आपल्या नावापुढे 'मी मोदींचा परिवार' असे लिहीले आहे. याच मुद्दयावर भाजप मुख्यालयात प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीही पत्रकार परिषद घेतली.

राष्ट्रीय जनता दलाने शनिवारी पाटणा येथील गांधी मैदानावर मोठ्या सभेचे आयोजन केले होते. यात इंडिया आघाडीचे नेतेही सहभागी झाले होते. बिहारमधील जनतेला संबोधित करताना लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका केली होती. "नरेंद्र मोदी आजकाल परिवारवादावर बोलत आहेत. मात्र त्यांना परिवार नाही. आणि ते हिंदूही नाहीत." अशा शब्दात लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

लालूप्रसाद यादव यांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तेलंगणातील आदिलाबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "माझ्या कुटुंबामुळे इंडिया आघाडीकडून मला लक्ष्य करण्यात आले. परंतु संपूर्ण देश माझे कुटुंब आहे. देशात राहणारे सर्वच नागरिक माझ कुटूंबीय आहेत. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीत बुडलेले इंडिया आघाडीचे नेते अस्वस्थ होत आहेत. आता त्यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांचा खरा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जेव्हा मी त्यांच्या घराणेशाहीवर बोलतो तेव्हा हे लोक मोदींना कुटुंब नाही असे म्हणू लागले आहेत. उद्या ते असेही म्हणू शकतील की तुम्हाला कधीही तुरुंगवासाची शिक्षा झाली नाही, त्यामुळे तुम्ही राजकारणात येऊ शकत नाही." असा टोलाही मोदींनी लगावला.

'चौकीदार चोर है'ची पुनरावृत्ती?

काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'चौकीदार चोर है'चा नारा दिला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य करत 'मैं भी चौकीदार' मोहीम सुरू केली होती. आणि भाजप नेते, पदाधिकारी यांनी सोशल मिडियावर 'मैं भी चौकीदार' असे लिहीते होते. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुटुंबच नाही, अशा स्वरुपाची टीका केल्यानंतर आता भाजपच्या वतीने "मोदी का परिवार" म्हणत प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news