Israel | लेबनॉनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलमध्ये एका भारतीयाचा मृत्यू, दोघे जखमी, तिघेही केरळचे

Israel | लेबनॉनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलमध्ये एका भारतीयाचा मृत्यू, दोघे जखमी, तिघेही केरळचे

पुढारी ऑनलाईन : लेबनॉनमधून डागलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात इस्रायलच्या उत्तर सीमेजवळ एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी घडली. हे तिघे भारतीय मूळचे केरळचे आहेत, असे वृत्तात म्हटले आहे.

लेबनॉनमधून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास इस्रायलच्या उत्तरेकडील गॅलिली प्रदेशातील मोशाव (सामूहिक कृषी समुदाय) मार्गालिओट येथील भागावर कोसळले, असे बचाव सेवा मॅगेन डेव्हिड अडोम (एमडीए) चे प्रवक्ते झाकी हेलर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

या घटनेतील मृताचे नाव पॅटनिबीन मॅक्सवेल असे नाव आहे. तो मूळचा केरळमधील कोल्लम येथील आहे. बूश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेल्विन अशी जखमी झालेल्या दोन भारतीयांची नावे आहेत.

"जॉर्जच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दुखापत झाल्यामुळे त्याला पेटा टिक्वा येथील बेलिन्सन रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर तेथे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची प्रकृती आता ठीक आहे आणि त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तो आता भारतातील त्याच्या कुटुंबाशी बोलू शकतो," असे अधिकृत सूत्राने सांगितले.

मेल्विनला किरकोळ दुखापत झाली होती. त्याला उत्तर इस्रायलीच्या साफेड येथील झिव्ह हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील आहे.

हा हल्ला लेबनॉनमधील शिया हिजबुल्लाह गटाने केला होता. जो गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान हमासच्या समर्थनार्थ ८ ऑक्टोबरपासून रोज उत्तर इस्रायलवर रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले करत आहे.

हे ही वाचा ;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news